शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भारत ‘अ’ची दमदार मजल

By admin | Updated: July 16, 2014 02:35 IST

नमन ओझा (११०) व उमेश यादव (९०) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात आज

ब्रिस्बेन : नमन ओझा (११०) व उमेश यादव (९०) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात आज तिस-या दिवशी मंगळवारी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध पहिल्या डावात दमदार मजल मारली. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या पहिल्या डावातील ४२३ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात ५०१ धावा फटकाविल्या. अंधुक प्रकाशामुळे आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला, त्या वेळी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला केवळ १ चेंडू खेळता आला होता. यजमान संघाला पाहुण्या संघाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ७८ धावांची गरज असून त्यांच्या सर्व विकेट शिल्लक आहेत. मधल्या फळीतील फलंदाज ओझाने या मालिकेत कामगिरीत सातत्य राखताना शतकी खेळी केली. ओझाने १३४ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. भारताच्या डावात तळाच्या फळीतील उमेश यादवची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. यादवने ६६ चेंडूंमध्ये ११ चौकार व ५ षटकारांच्या साहाय्याने ९० धावांची आक्रमक खेळी केली. बेन कटिंगने यादवला तंबूचा मार्ग दाखवीत भारताचा डाव संपुष्टात आणला. ओझालाही कटिंगने माघारी परतवले. याव्यतिरिक्त अमित मिश्राचे (३६ धावा, ६७ चेंडू, ६ चौकार) योगदानही उल्लेखनीय ठरले. ओझा व मिश्रा यांनी ८२ धावांची भागीदारी केली. जसप्रित बुमराह १६ धावा काढून नाबाद राहिला. त्याआधी, कालच्या ३ बाद १६५ धावसंख्येवरून पुढे खेळताना बाबा अपराजित (२८) व मनोज तिवारी (६३) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. अंबाती रायडूने ६० चेंडूंना सामोरे जाताना ४० धावांचे योगदान दिले. अनुरित सिंग (८) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यादवने अनुरित सिंगसोबत दहाव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. अंधुक प्रकाशामुळे आज तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळेपूर्वीच थांबविण्यात आला. त्या वेळी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे फिलिप ह्यूज व अ‍ॅलेक्स डुलन खेळपट्टीवर होते. त्याआधी, आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघातर्फे बेन कटिंगने २६.२ षटकांत १०० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. कटिंगने ओझा, मिश्रा, अनुरित सिंग आणि उमेश यादव यांना माघारी परतवले. चाड सेयर्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३० षटकांत ८४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले तर मोर्न मार्शने २६ धावांत एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)