दुबई : द. आफ्रिकेचा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने धुव्वा उडविणारा भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला. कोहलीच्या संघाला ३-० ने विजयानंतर दहा गुण मिळाले. संघाचे १०० वरून ११० गुण झाले आहेत. आॅस्ट्रेलिया तिसऱ्या आणि पाक चौथ्या स्थानावर आहे. पराभवानंतरही द. आफ्रिका संघ मात्र अव्वल स्थानावर राहिला.आफ्रिकेची गुणांची आघाडी मात्र १६ वरून केवळ चारवर आली. भारताला १ एप्रिलपर्यंत कुठलीही कसोटी खेळायची नाही पण आठव्या स्थानावर असलेला वेस्ट इंडिज तीन सामने खेळण्यासाठी १० डिसेंबरपासून आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर येत आहे. सहाव्या स्थानावर असलेला न्यूझीलंडदेखील १० डिसेंबरपासून सातव्या स्थानावर असलेल्या लंकेविरुद्ध कसोटी खेळेल. पाचव्या स्थानावर असलेला इंग्लंड २६ डिसेंबरपासून द. आफ्रिकेचा चार सामन्यांचा दौरा करणार आहे.
आयसीसी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर
By admin | Updated: December 8, 2015 02:21 IST
द. आफ्रिकेचा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने धुव्वा उडविणारा भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला
आयसीसी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}