शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-न्यूझीलंड ‘फायनल’ची भविष्यवाणी !

By admin | Updated: March 1, 2015 01:16 IST

आॅकलंडमध्ये दोन यजमान आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सामन्याबाबतच्या उत्साहाला उधाण आले होते. उभय देशांदरम्यान क्रिकेटमध्ये पारंपरिक स्पर्धा राहिली आहे.

आॅकलंडमध्ये दोन यजमान आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड मधील सामन्याबाबतच्या उत्साहाला उधाण आले होते. उभय देशांदरम्यान क्रिकेटमध्ये पारंपरिक स्पर्धा राहिली आहे. सामन्याच्या आधी लोकांमध्ये चालणाऱ्या चर्चेमध्ये याची झलक दिसली. प्रत्येकाच्या ओठावर सामन्याची चर्चा तर होतीच, पण आश्चर्य असे की भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलची भविष्यवाणीदेखील अनेकजण करताना दिसले.पब असो, दुकान किंवा बार, अशी सर्वत्र आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्याबद्दल चर्चा चालली. वेटर असेल किंवा टॅक्सीचालक असेल, सर्वच जण या सामन्याबद्दल बोलत होते. उभय देशांमधील चाहत्यांसाठी हा ‘महासंग्राम’ होता. सामना सुरू होताच उभय संघांतील चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. दोन्हीकडील चाहत्यांनी संघाला प्रोत्साहन देण्यात कुठलीही कसर शिल्लक राखली नाही. क्वीन्सटाऊनमधून आॅकलंडमध्ये आलेल्या एका चाहत्याशी येथे गाठ पडली; पण तो स्टेडियममध्ये पोहोचू शकला नव्हता. न्यूझीलंडमध्ये ब्रेंडन मॅक्युलम सर्वांचा आवडता आहे. त्याच्या आक्रमक खेळाच्या बळावर न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध रोमहर्षक विजय नोंदविला. न्यूझीलंड एका गड्याने जिंकला, पण या विजयाचा उत्साह इतका मोठा होता की, हा विजय मोठ्या फरकाने साजरा झाला असे वाटत होते. या सामन्याद्वारे एक सिद्ध झाले की, ‘कमी धावसंख्येचे सामनेदेखील चाहत्यांचा श्वास रोखून धरू शकतात.’न्यूझीलंडचे चाहते आपल्या संघाला विश्वचषकात सर्वोत्तम मानतात. हे चाहते फारच सकारात्मक आहेत. आश्चर्यकारकरीत्या त्यांनी भारत-न्यूझीलंडदरम्यान फायनल होण्याची भविष्यवाणी केली. भारताने सलग तिसऱ्या विजयासह ‘ब’ गटात अव्वल स्थान काबीज केले. शिवाय न्यूझीलंडसोबत विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा संयुक्तपणे पहिला देश होण्याचा मान मिळविला. यामुळे कदाचित भारत-न्यूझीलंड यांच्यात फायनल खेळले जाईल, या चर्चेला ऊत आला असावा.वास्तव्यासाठी हॉटेलसह अपार्टमेंट! आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीचे साक्षीदार होण्यासाठी आॅकलंडमध्ये दूरदुरून क्रिकेट चाहते आले होते. त्यांच्या वास्तव्यासाठी हॉटेलसह अपार्टमेंट उपलब्ध होते. पर्यटक येथे हॉटेलशिवाय अपार्टमेंटदेखील भाड्याने घेऊ शकतात. समूहाने आलेली मंडळी दोन- दोन बेडरूम असलेले अपार्टमेंट घेतात, तर दोन व्यक्ती असल्यास एखाद्या घरात खोली घेतात. एखाद्या घरात तीन बेडरूम असतील तर घरमालक एक बेडरूम वापरतो. उर्वरित दोन बेडरूम पर्यटकांना भाड्याने दिल्या जातात. पर्यटक कितीही दिवस वास्तव्य करूशकतात. हॉटेलच्या तुलनेत अपार्टमेंट किंवा घरची खोली स्वस्त दरात उपलब्ध होते.