शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भारताने आॅस्ट्रेलियाला रोखले

By admin | Updated: April 15, 2015 01:14 IST

सलग दोन पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी हॉक बे कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाला गोलशून्यने बरोबरीत रोखले.

हॅस्टिग्स : सलग दोन पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी हॉक बे कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाला गोलशून्यने बरोबरीत रोखले.भारताला या स्पर्धेत सुरुवातीला चीन व अमेरिका या संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. मात्र आज भारताने आॅस्ट्रेलियाला बरोबरीत रोखत गुणाचे खाते उघडले. आॅस्ट्रेलियाने या अनिर्णित निकालासह ‘ड्रॉ’ची हॅट््ट्रिक केली. भारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यानच्या लढतीत उभय संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला, पण दोन्ही संघांची बचाव फळी उत्तम असल्यामुळे गोलफलक कोराच राहिला. भारतीय गोलकीपरने चांगला बचाव करीत आॅस्ट्रेलियाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळवला होता, पण भारतीय बचावपटूंनी चांगला बचाव केला. पहिला क्वार्टर संपयाला काही सेकंदाचा अवधी शिल्लक असताना आॅस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारतीय गोलकीपरने त्यांचे आक्रमन परतावून लावले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या अनुराधा थोकचोमला आॅस्ट्रेलियन डीमध्ये नियमबाह्य पद्धतीने रोखण्यात आले. भारताला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला, पण आॅस्ट्रेलियन गोलकिपरने शानदार बचाव केल्यामुळे भारताचे आघाडी घेण्याचे स्वप्न भंगले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल नोंदविण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. भारताला यानंतर १६ एप्रिल रोजी न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही लढत भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होईल. (वृत्तसंस्था)भारताचा बचावभारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यानच्या लढतीत उभय संघांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला़ पण दोन्ही संघांची बचाव फळी उत्तम असल्यामुळे गोलफलक कोराच राहिला. भारतीय गोलकीपरने चांगला बचाव करीत आॅस्ट्रेलियाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर मिळवला होता, पण भारतीय बचावपटूंनी चांगला बचाव केला.