शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

भारताची सेमीफायनलमध्ये धडक, बांग्लादेशवर १०९ धावांनी विजय

By admin | Updated: March 19, 2015 17:10 IST

रोहित शर्माच्या दमदार शतकानंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे भारताने बांग्लादेशचा १०९ धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मेलबोर्न, दि. १९ - रोहित शर्माच्या (१३७) दमदार शतकानंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे भारताने बांग्लादेशचा १०९ धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचे सर्व फलंदाज १९३ धावांवर बाद झाले. उमेश यादवने ४ तर शमी व जडेजाने प्रत्येकी २ आणि मोहित शर्माने १ बळी टिपत बांग्लादेशच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. विश्वचषक स्पर्धेत भारताने हा सलग सातवा सामना जिंकला असून कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा शंभरावा विजय आहे. उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाशी भारताची सेमी फायनलमध्ये गाठ पडेल. 

तत्पूर्वी रोहित शर्मा व सुरेश रैनाच्या खेळीच्या आधारे भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३०२ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीने भारताने ३०० चा टप्पा ओलांडला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या ७५ धावा झाल्या असताना बांग्लादेशच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात यश आले. शिखर धवन ३० धावांवर यष्टीचित झाला. यानंतर विराट कोहली ३, अजिंक्य रहाणे १९ धावांवर बाद झाला. भारताची स्थिती २८ षटकांत ३ बाद ११५ अशी झाली  यानंतर रोहितने सुरेश रैनासोबत शतकी भागीदारी कर भारताचा डाव सावरला.या जोडीने १२२ धावांची भागीदारी रचली. सुरेश रैना ६५ धावांवर बाद झाला. रोहित शर्माने वन डे कारकिर्दीतील ७ वे तर वर्ल्डकपमधील पहिले वहिले शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये फॉर्ममध्ये नसल्याने टीका करणा-या टीकाकारांनाही रोहितने त्यांच्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.  

शेवटच्या पाच षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा १३७ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने १० चेंडूत ४ चौकार ठोकून २३ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली.  ५० षटकांत रुबेल हुसैन यॉर्कर टाकून जडेजा व आर. अश्विनला फटकेबाजीची संधीच दिली नाही व भारताचा डाव ५० षटकांत ३०२ धावांवर रोखण्यात त्याला यश आले. बांग्लादेशतर्फे तास्कीन अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मशरफे मोर्तझा, रुबेल हुसैन व शकीब अल हसन या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.