शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा ऑस्ट्रेलियाकडून २५ धावांनी पराभव

By admin | Updated: January 20, 2016 18:34 IST

सलग तीन सामन्यातील पराभवांमुळे मालिका गमाविणा-या भारतीय संघाचा पुन्हा ऑस्टेलिया संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात २५ धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमत
कॅनबेरा, दि. २० - सलग तीन सामन्यातील पराभवांमुळे मालिका गमाविणा-या भारतीय संघाचा पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात २५ धावांनी पराभव केला. या पराभवामुऴे भारतीय फलंदाज शिखर धवन आणि विराट कोहली यांची शतकी खेऴी व्यर्थ ठरली. 
चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या ३४९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीला दमदार फलंदाजी केली, मात्र मधल्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीमुऴे भारताला या सामन्यात सुद्धा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, या पराभवाची जबाबदारी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्विकारली आहे. 
भारताचा फलंदाज शिखर धवन आणि विराट कोहली यांनी शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतील नववे शतक झळकाविले. शिखर धवनने ११३ चेंडूत १४ चौकार लगावत २ षटकारांसह १२६ धावा केल्या, तर विराट कोहलीने ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. रोहित शर्मा ४१ धावांवर बाद झाला, त्याला रिचर्डसनने झेलबाद केले.  कर्णधार महेंद्रसिंग धोनी (०), गुरकिरत मान (५)अजिंक्य रहाणे (२), ऋषी धवन (९), भुवनेश्वर कुमारने २ धावा केल्या तर उमेश यादवही २ धावा करुन तंबूत परतला. 
सलामीवीर एरॉन फिंच (१०७) शतकी खेळी आणि डेव्हीड वॉर्नरच्या (९३) धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३४८ धावांचा पल्ला गाठला. एरॉन फिंचच्या शतकी खेळीनंतर त्याला भारतीय गोलंदाज उमेश यादवने इशांत शर्मा करवी झेलबाद केले. तर वॉर्नरला इशांत  तर, फिंचला हाणामारीच्या षटकात मॅक्सवेलने २० चेंडूत (४१) आणि कर्णधार स्मिथनेही २९ चेंडूत (५१) धावा तडकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३५० पर्यंत पोहोचता आले. पहिल्या तीन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाज झगडताना दिसले. मात्र यात त्यांना अपयश आल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखणे त्यांना जमले नाही.  मार्शने (३३), बेलीने (१०) धावा केल्या. हाणामारीच्या षटकात फॉकनर आणि वाडे भोपळाही न फोडता तंबूत परतले. इशांत शर्माने सर्वाधिक चार गडी बाद केले असले तरी त्यासाठी त्याने १० षटकात ७७ धावा मोजल्या. उमेश यादवे १० षटकात ६७ धावा देत तीन गडी बाद केले.