भारत नेहमीच ब्लाटर यांच्या पाठीशी

By Admin | Updated: May 31, 2015 01:33 IST2015-05-31T01:33:31+5:302015-05-31T01:33:31+5:30

आखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) ‘फिफा’चे अध्यक्ष सॅप ब्लाटर यांची पाठराखण केली आहे.

India always back Blatter | भारत नेहमीच ब्लाटर यांच्या पाठीशी

भारत नेहमीच ब्लाटर यांच्या पाठीशी

पणजी : आखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) ‘फिफा’चे अध्यक्ष सॅप ब्लाटर यांची पाठराखण केली आहे. ब्लाटर १९९८ मध्ये पहिल्यांदा ‘फिफा’चे अध्यक्ष झाले तेव्हापासून भारताने प्रत्येक निवडणुकीत त्यांना मतदान केले आहे. ‘एआयएफएफ’ने या निवडणुकीसाठी ज्यांचे नामांकन केले त्यांनी मतदान करण्यापूर्वी दुसऱ्या कोणाला मत द्यायचे याचा कधी विचारही केला नाही.
१९९८ मध्ये ब्लाटर ‘युईएफए’चे माजी अध्यक्ष लेनार्ट जॉनसन यांच्याविरुद्ध निवडणुकीत उभे होते तेव्हापासून ‘एआयएफएफ’चे माजी अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी यांनी ही परंपरा सुरू केली. या निवडणुकीवेळी फिफा प्रतिनिधींच्या हाती एक लिफाफा देण्यात आला होता. या निवडणुकीत भारताच्या पाठिंब्याच्या जोरावर ब्लाटर यांनी बाजी मारली होती
२००७ मध्ये ब्लाटर यांनी भारताला भेट दिली तेव्हा त्यांची ‘फिफा’च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली होती. २००१ मध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी मोहमद बिन हम्मान यांनी माघार घेतल्याने त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली.
‘फिफा’चा एक अधिकारी म्हणाला, ‘ब्लाटर यांच्या खिशात नेहमीच भारताचे मत असते. त्यांनी नेहमीच फुटबॉलमध्ये भारतासारख्या उभरत्या देशाला मदत केली आहे.

Web Title: India always back Blatter