आईसलँडने पोर्तुगालला बरोबरीत रोखले

By Admin | Updated: June 15, 2016 05:50 IST2016-06-15T02:21:42+5:302016-06-15T05:50:47+5:30

यूरो कप फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील रंगतदार सामना १ - १ असा बरोबरीत सुटला. सुरुवातीपासूनच पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील सामन्यात रंगत

Iceland pauses Portugal | आईसलँडने पोर्तुगालला बरोबरीत रोखले

आईसलँडने पोर्तुगालला बरोबरीत रोखले

ऑनलाइन लोकमत
फ्रान्स, दि. १५ - यूरो कप फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील रंगतदार सामना १ - १ असा बरोबरीत सुटला.
सुरुवातीपासूनच पोर्तुगाल आणि आईसलँड यांच्यातील सामन्यात रंगत निर्माण झाली होती. ३१ व्या मिनिटाला लुईस नानी याने गोल करुन पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. मात्र, उत्तरार्धाच्या सुरवातीलाच सामन्याच्या ५० व्या मिनिटाला आईसलँडच्या बिक्रीर बजार्नासन याने बरोबरी साधणारा गोल केला. त्यानंतर सामन्याच्या शेवटपर्यंत आईसलॅंडने पोर्तुगाल रोखून धरले. या सामन्यात पोर्तुगालचा स्टार स्ट्राइकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने याच्या गोलकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्याला एकही गोल या सामन्यात करता आला नाही. 

 

Web Title: Iceland pauses Portugal