शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

व्होजेसचे पदार्पणात शतक

By admin | Updated: June 6, 2015 01:12 IST

अ‍ॅडम व्होजेसच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात १७० धावांची आघाडी घेत आपली स्थिती मजबूत केली.

रोसेयू : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अ‍ॅडम व्होजेसच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात १७० धावांची आघाडी घेत आपली स्थिती मजबूत केली. दरम्यान अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्ट इंडिजने दुसऱ्या सत्रात ५३ षटकांत ३ बाद १४३ धावा अशी मजल मारली होती.व्होजेसच्या नाबाद १३० धावांच्या बळावर आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या. त्याआधी लेगस्पीनर देवेंद्र बिशू याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजने आॅस्ट्रेलियाची एक वेळ ६ बाद १२६, अशी बिकट स्थिती केली होती.आॅस्ट्रेलियाच्या अखेरच्या ४ फलंदाजांनी १९२ धावांची भर त्यांच्या धावसंख्येत घातली. बिशूने त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ८० धावांत ६ गडी बाद केले. तो कसोटी क्रिकेटमध्ये ५० गडी बाद करणारा वेस्ट इंडीजचा दुसरा लेगस्पीनर ठरला.छत्तीस वर्षांचा होणाऱ्या व्होजेसने उशिरा कसोटी पदार्पण केल्यानंतरही शतक ठोकताना वेस्ट इंडीजच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्याने मिशेल जॉन्सनच्या साथीने सातव्या गड्यासाठी ५२ धावांची आणि नाथन लियोन याच्या साथीने नवव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. तसेच अखेरच्या जोडीसाठी हेजलवूडच्या साथीने २८.४ षटकांत ९७ धावांची भागीदारी करताना आॅस्ट्रेलियाला ३०० धावांचा पल्ला पार करून दिला. वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळती झाली. त्यांनी २५ धावांतच २ गडी गमावले. यानंतर डॅरेन ब्रावो (५) देखील लगेच परतल्याने त्यांचा डाव ३ बाद ३७ धावा असा घसरला. यावेळी शेन डोवरीच व मार्लेन सॅम्युअल्स यांनी संघाला सावरले. अखेरचे वृत्त हाती तेव्हा विंडिजने ५३ षटकांत ३ बाद १४३ धावा फटकावल्या होत्या. डोवरीच (नाबाद ४९) आणि सॅम्युअल्स (नाबाद ५४) खेळपट्टीवर टिकून आहेत.(वृत्तसंस्था)वेस्ट इंडीज : पहिला डाव १४८. आॅस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर झे. ब्लॅकवूड गो. टेलर ८, शॉन मार्श झे. ब्राव्हो गो. होल्डर १९, स्टीव्ह स्मिथ यष्टि. रामदिन गो. बिशू २५, मायकल क्लार्क झे. रामदिन गो. बिशू १८, अ‍ॅडम व्होजेस नाबाद १३०, शेन वॉटस्न झे. होल्डर गो. बिशू ११, ब्रॅड हॅडिन त्रि. गो. बिशू ८, नाथन लियोन पायचीत गो. गॅब्रियल २२, जोश हेजलवूड त्रि. गो. सॅम्युअल्स ३९, अवांतर : १८, एकूण : १०७ षटकांत सर्वबाद ३१८.वेस्ट इंडीज : दुसरा डाव : ब्रेथवेट त्रि. गो. स्टार्क १५, एस. होप झे. क्लार्क गो. जॉन्सन २, एस. डोवरिच खेळत आहे ४९, डी. ब्राव्हो खेळत आहे ५४. अवांतर : १८, एकूण : ५३ षटकांत ३ बाद १४३.