हृतिक, अनुष्का उद्घाटनाचे आकर्षण

By Admin | Updated: April 5, 2015 02:02 IST2015-04-05T02:02:51+5:302015-04-05T02:02:51+5:30

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि शाहिद कपूर हे कोलकाता येथे ७ एप्रिल रोजी रंगणाऱ्या आयपीएलच्या आठव्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असतील.

Hrithik, Anushka inaugurated attractions | हृतिक, अनुष्का उद्घाटनाचे आकर्षण

हृतिक, अनुष्का उद्घाटनाचे आकर्षण

नवी दिल्ली : बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि शाहिद कपूर हे कोलकाता येथे ७ एप्रिल रोजी रंगणाऱ्या आयपीएलच्या आठव्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असतील.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी ही माहिती देताना सांगितले, की अनेक कलावंत एका व्यासपीठावर येत मनोरंजनाची मेजवानी सादर करतील. या कार्यक्रमाचे संंचालन सैफ अली खान करणार आहे. फरहान अख्तर, संगीतकार प्रीतम, हृतिक, अनुष्का शर्मा हे सर्वजण समारंभात नृत्याविष्कार सादर करणार आहेत. सर्व आठही संघांचे कर्णधार या वेळी क्रिकेट भावनेची शपथ ग्रहण करतील. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर हा ट्रॉफी सर्वांसमक्ष सादर करीत स्पर्धेची सुरुवात करणार आहे.
सायंकाळी दोन तास चालणारा हा कार्यक्रम ७.३० वाजता सुरू होईल. आयोजन स्थळाची दारे सायंकाळी पाच वाजता उघडण्यात येतील. उद्घाटन कार्यक्रमाचे तिकीट २०० रुपये आहे. उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोनी मॅक्स आणि सोनी सिक्सवर होणार आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Hrithik, Anushka inaugurated attractions