शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

यजमानांना पूरक खेळपट्टी हवीच!

By admin | Updated: November 5, 2015 02:28 IST

रवी शास्त्री यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मिळायलाच हवी. या संदर्भात शास्त्रींचे वक्तव्य सहजरीत्या सकारात्मक घेतले जावे. क्षमतेनुरूप खेळण्यासाठी

वसीम अक्रम लिहितो़...रवी शास्त्री यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मिळायलाच हवी. या संदर्भात शास्त्रींचे वक्तव्य सहजरीत्या सकारात्मक घेतले जावे. क्षमतेनुरूप खेळण्यासाठी घरच्या खेळपट्टीचा लाभ यजमान संघाला मिळायलाच हवा. तथापि, खेळपट्टी ही खूप वळण घेणारी नसावी. ती थोडी टणक आणि फिरकीला अनुकूल असावी. मी मुंबईसारख्या ‘पाटा’ खेळपट्टीबाबत बोलणार नाही. तेथे आफ्रिकेने ४०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या. जेव्हा घरच्या मैदानावर खेळतो, तेव्हा यजमान संघाची मागणी समजण्यासारखीच असते. शास्त्री संघाचे संचालक असल्याने त्यांची मागणी यथोचित आहेच. मनाप्रमाणे खेळपट्टी मागितल्याबद्दल शास्त्रीवर टीका झाली, हे मला माहिती आहे. जेव्हा आम्ही द. आफ्रिका किंवा आॅस्ट्रेलियाचा दौरा करतो, तेव्हा हिरव्यागार खेळपट्ट्या मिळतात. तेथे चेंडू फार कमी वळण घेतात. मग घरच्या मैदानावर आम्हाला आमच्या मनाप्रमाणे का नको? शास्त्री यांनी यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी मागताच ‘हाय तोबा’ सुरू झाले आहे.वन डे मालिकेत भारताला आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेट हा वेगळाच प्रकार आहे. अखेरच्या वन डेचा अपवाद वगळता उर्वरित चारही सामन्यांत भारत चांंगलाच खेळला. सामान्यपणे मोहालीच्या खेळपट्टीवर गवत असते. यामुळे चेंडू चौथ्या आणि पाचव्या दिवशी ‘टर्न’ होतो. माझ्या मते ही आदर्श खेळपट्टी असेल.द. आफ्रिका बलाढ्य संघ आहे. या संघाकडे ताशी १४० किमी वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. या गोलंदाजांपुढे भारतीयांची खरी परीक्षा असेल. हे पाहता, उमेश यादव तसेच वरुण अ‍ॅरोन यांनी योग्य लय आणि वेग राखून मारा करायला हवा. असे घडल्यास आफ्रिकेच्या फलंदाजांवर जरब बसविणे सोपे होईल. ईशांतचे निलंबन भारतीय गोलंदाजी माऱ्याला धक्का बसण्यासारखे आहे. आश्विनने पूर्णपणे फिट झाल्यानंतरच मैदानात यावे, असा त्याला माझा मोलाचा सल्ला असेल. विराटसाठी कर्णधार या नात्याने ही मालिका अत्यधिक महत्त्वाची ठरावी. (टीसीएम)