यजमानांकडे उत्तम फलंदाज व गोलंदाज आहेत : गांगुली

By Admin | Updated: March 3, 2017 00:13 IST2017-03-03T00:13:19+5:302017-03-03T00:13:19+5:30

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत पुनरागमन करेल. यजमान संघाकडे उत्तम फलंदाज आणि गोलंदाज आहेत.

The hosts have good batsmen and bowlers: Ganguly | यजमानांकडे उत्तम फलंदाज व गोलंदाज आहेत : गांगुली

यजमानांकडे उत्तम फलंदाज व गोलंदाज आहेत : गांगुली


नवी दिल्ली : माजी कर्णधार सौरव गांगुली याने टीम इंडियावर विश्वास दाखवताना म्हटले की, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत पुनरागमन करेल. यजमान संघाकडे उत्तम फलंदाज आणि गोलंदाज आहेत. गांगुली म्हणाला की,‘‘ गेल्या दहा महिन्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली होती. सर्व सामने संघाने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना पुनरागमन करावे लागेल. आणि चांगला खेळ करावा लागेल. या आधी अनेक संघ अशा प्रकारे पराभूत झाले आहेत. हे पहिल्यांदाच झाले आहे असे नाही. या आधीदेखील हे घडले आहे. ’’ पुनरागमन करताना रवींद्र जाडेजा आणि आश्विन यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल. उमेश यादव याने पुण्यात चांगली गोलंदाजी केली. मी त्याला कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना पाहत अहे. भारतीय संघाचा स्वत:वरील विश्वास महत्त्वाचा ठरेल. भारताला डीआरएसचा वापर योग्य पद्धतीने करावा लागेल., असेही गांगुली म्हणाला.

Web Title: The hosts have good batsmen and bowlers: Ganguly