शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचाराने प्रेरित झाले

By admin | Updated: September 8, 2016 04:28 IST

रिओ आॅलिंपिक माझे पहिलेच आॅलिंपिक असल्याने प्रशिक्षक गोपीचंद यांनी मला कोणत्याही दडपणाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला

मुंबई : रिओ आॅलिंपिक माझे पहिलेच आॅलिंपिक असल्याने प्रशिक्षक गोपीचंद यांनी मला कोणत्याही दडपणाशिवाय खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच प्रत्येक वेळी कोर्टवर उतरल्यानंतर ‘होय, मी हे करू शकते’ असा सकारात्मक विचार करून स्वत:ला प्रेरित करीत होते. किंबहुना हाच माझ्या रिओ यशाचा मंत्र आहे, असे रिओ पदकविजेती पी. व्ही. सिंधूने सांगितले.मुंबईत झालेल्या एका सत्कार समारंभादरम्यान सिंधूने आपली प्रतिक्रिया दिली. ‘जम्प स्मॅश’बाबत सिंधू म्हणाली, ‘‘रिओच्या काही दिवसांआधी मी जम्प स्मॅशचा कसून सराव केला. माझ्या वडिलांना जम्प स्मॅश खूप आवडत असे. त्यामुळे मी जम्प स्मॅश शिकण्याची इच्छा प्रशिक्षकांपुढे मांडली. त्यांनी तत्काळ त्या पद्धतीने सराव घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला उंचीचा अंदाज न आल्याने खूप वेळा शटल नेटमध्येच राहिले. मात्र सातत्याने सराव केल्यानंतर जम्प स्मॅश शिकले. रिओ आॅलिंपिकमध्ये माझ्या उंचीचा फायदा घेत जम्प स्मॅशचा प्रभावी वापर खूप फायदेशीर ठरला. अंतिम सामन्यात दडपण नव्हते; मात्र संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षा माझ्यावर आहेत, याची जाणीव होती. आॅलिंपिकमध्ये पदक मिळवणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. निर्णायक सामन्यात मी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. मरिन कॅरोलिनाने दर्जेदार खेळ केला. पराभवामुळे निराश झाली खरी; मात्र ती वेळ माझ्या पराभवाचे चिंतन करण्याची नव्हती तर एक खेळाडू म्हणून कॅरोलिनाच्या विजयाचे अभिनंदन करण्याची होती,’’ अशा शब्दांत भावना सिंधूने व्यक्त केल्या. गत आॅलिंपिकच्या तुलनेत यंदो चिनी बॅडमिंटनपटूंचे वर्चस्व कमी होते. एकंदरीत आॅलिंपिक यशाकडे पाहता आता जबाबदारी वाढली आहे. ‘‘आगामी वर्ल्ड सुपर सिरिजमध्ये सुवर्णपदकाच्या निर्धाराने मी तयारी करत आहे. आॅलिंपिकमध्ये पदक मिळवल्याने आता माझ्यावर अधिक जबाबदारी आलेली आहे.’’ असे ती शेवटी म्हणाली.(क्रीडा प्रतिनिधी)