शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिकने ठोकल्या षटकांत ३४ धावा

By admin | Updated: January 12, 2016 04:19 IST

बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सी ग्रुपमध्ये धुवाधार बॅटिंग करताना षटकात ३४ धावा कुटल्या. दिल्लीचा मध्यमगती गोलंदाज आकाश

नवी दिल्ली : बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सी ग्रुपमध्ये धुवाधार बॅटिंग करताना षटकात ३४ धावा कुटल्या. दिल्लीचा मध्यमगती गोलंदाज आकाश सुदनने या षटकांत एकूण ३९ धावा दिल्याने न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिशने जुलै २०१२मध्ये एका षटकांत ३८ धावा काढल्याचा विक्रम आज मोडला गेला.पंड्याच्या या तुफानी खेळीनंतरही बडोदा संघ या सामन्यात ५ विकेटनी पराभूत झाला. या सामन्यात १९व्या षटकांत पंड्याने सुदनला ५ षटकार आणि एक चौकार ठोकला, तर एक धाव नोबॉलची व एका चेंडूवर बाईजच्या चार धावा निघाल्या. या षटकात ३९ धावा देणाऱ्या सुदनने यापूर्वीच्या ३ षटकांत ८ धावा देऊन २ बळी घेतले होते. पण, शेवटच्या षटकाने त्याचे सर्व पृथक्करणच बदलून टाकले. आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघात समावेश झालेल्या हार्दिकला या खेळीमुळे अंतिम ११ जणांमध्ये जागा मिळण्यास सोपे जाईल. टी-२० क्रिकेटमध्ये षटकांत सर्वाधिक ३८ धावा काढण्याचा स्कॉट स्टायरिशचा विक्रम मोडण्यात हार्दिकला यश मिळाले. स्टायरिशने २०१२मध्ये एका कौंटी सामन्यात हा विक्रम केला होता.पंड्याची जोरदार फलंदाजी आयपीएल २०१५च्या सत्रापासून चर्चेत आली होती. मुंबई इंडियन्सने त्याला फिनिशर म्हणून वापरले होते. (वृत्तसंस्था)