शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गेल वादळात आफ्रिका भुईसपाट

By admin | Updated: January 10, 2015 23:47 IST

स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (३१ चेंडूंत ७७ धावा) वादळी अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेट्सनी शानदार विजय मिळविला़

केपटाऊन : स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (३१ चेंडूंत ७७ धावा) वादळी अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४ विकेट्सनी शानदार विजय मिळविला़ गेलने आपल्या खेळीत ८ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार लगावताना आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला़ विशेष म्हणजे पहिल्या सहा चेंडूंत केवळ १ धाव करणाऱ्या गेलने आपले अर्धशतक अवघ्या १७ चेंडूंत पूर्ण केले़गेलला भारताच्या युवराजसिंगचा विक्रम मात्र तोडता आला नाही़ युवीने २००७ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये अवघ्या १२ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली होती़ त्याने इंग्लंडविरुद्ध ही किमया साधली होती़ गेलच्या सुपर खेळीनंतरही विंडीजने अवघे ४ चेंडू शिल्लक ठेवून १९़२ षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात १६६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले़ख्रिस गेल ११व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला़ त्यानंतर विंडीज या लढतीत सहज विजय मिळवेल, असे वाटत होते; मात्र यानंतर एकापाठोपाठ एक गडी बाद झाले़ मात्र, किरोन पोलार्डने अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड वेईसीला चौकार लगावताना संघाला विजय मिळवून दिला़ त्याआधी दक्षिण आफ्रिकेने रिली रोसेयू (नाबाद ५१) च्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकांत ४ बाद १६५ धावांचे कठीण आव्हान उभे केले़ रोसेयूने ४० चेंडूंचा सामना करताना ५ चौकार लगावले़ आफ्रिकेकडून फाफ डू प्लेसिस याने ३८ धावांची खेळी केली़ वेस्ट इंडीजकडून शेल्डन कोटरेल याने ३३ धावांत २, तर जेसन होल्डरने २० धावांत १ गडी बाद केला़ (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ४ बाद १६५़ (रिझा हेन्ड्रिक्स १२, फाफ डु प्लेसिस ३८, रिली रोसेयू नाबाद ५१, डेव्हिड मिलर २४, फरहान बेहर्डीन नाबाद १८़ शेल्डन कोटरेल २/३३, जेसन होल्डर १/२०)़ वेस्ट इंडीज : १९़२ षटकांत ६ बाद १६८़ (ड्वेन स्मिथ २०, ख्रिस गेल ७७, मार्लोन सॅम्युअल्स ४१, किरोन पोलार्ड नाबाद ८़ इमरान ताहिर ३/२८, वेन पार्नेल २/३९)़