शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थनाच्या यशाने बार्शीत आनंदोत्सव !

By admin | Updated: September 29, 2014 06:35 IST

आंतरराष्ट्रीय ख्यातीची व बार्शी (सोलापूर)ची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

भ. के. गव्हाणे, बार्शीआंतरराष्ट्रीय ख्यातीची व बार्शी (सोलापूर)ची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या आशियाई टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून सोलापूर जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकावले़ प्रार्थनाने या आशियाई स्पर्धेतील दुहेरीच्या लढतीत कांस्यपदक पटकावले़ तिच्या या कामगिरीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह बार्शीतील क्रीडाजगतात आनंदोत्सव पसरला आहे़प्रार्थनाने आज, रविवारी आंतरराष्ट्रीय भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत उपांत्यफेरीच्या लढतीत चिनी ताईपेच्या जोडीविरुद्ध एक तास ३५ मिनिटांपर्यंत संघर्ष केला़ मात्र, ती फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही़ त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले़माझे स्वप्न सुवर्णपदकाचे होते : प्रार्थनादक्षिण कोरियातील इंचियोन येथील आशियाई टेनिस स्पर्धेतील माझे पदक निश्चित होतेच; मात्र माझे स्वप्न सुवर्णपदक मिळविण्याचे होते, अशी महत्त्वाकांक्षी प्रतिक्रिया जिद्दी प्रार्थना ठोंबरेने दिली़प्रार्थनाने आपली आई वर्षा ठोंबरे हिच्यासोबत ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर संपर्क साधला असता तिने वरील प्रतिक्रिया दिली़ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपण संपूर्ण तयारी केली होती़सानियासोबत खेळण्याचा अनुभव हा निराळाच होता़ तिच्याकडून खूप काही शिकता आले़ आम्ही दोघींनी विजयासाठी खूपच संघर्ष केला; मात्र नशिबाने चिनी ताईपेच्या बाजूने विजयाचा कौल दिला़