शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदोत्सवात जर्मनी...!

By admin | Updated: July 16, 2014 02:28 IST

किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....अशा स्वरूपाची भावना मंगळवारी प्रत्येक जर्मन नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसून आली

बर्लिन : किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला....अशा स्वरूपाची भावना मंगळवारी प्रत्येक जर्मन नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसून आली. कारणही तसेच होते. देशाचे स्वप्न साकारणारा जगज्जेता संघ आज मायदेशी मोठ्या अभिमानाने परतला होता. या विश्वविजेत्या संघाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. दहा हजारांहून अधिक चाहत्यांची उपस्थिती पाहून संघातील प्रत्येकी खेळाडू भारावून गेला. वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या आपल्या टीमची एक झलक पाहण्यासाठी हजारो फुटबॉलप्रेमींनी येथील ब्रेंडेनबर्ग गेटवर उपस्थिती लावली. चौथ्यांदा किताब आपल्या नावे करणाऱ्या जर्मन संघाचे सकाळी विशेष विमानाने बर्लिनमधील टेगेल या विमानतळावर आगमन झाले़ संघाचा कर्णधार फिलिप लेहम सर्वप्रथम हातात विश्वचषक घेऊन विमानातून उतरला़ त्याच्या पाठोपाठ मिडफिल्डर बॅस्टियन श्वाज्नेगर जर्मन ध्वजासह विमानातून उतरला़ विमानातून उतरलेल्या जर्मन संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर जेतेपद मिळविल्याचा आनंद ओसंडून वाहत होता़ विमानतळाबाहेर आल्यानंतर जर्मन संघ स्वागत समारंभाच्या स्थळाकडे रवाना झाला़ खेळाडूंचे मायदेशी आगमन होणार असल्याची खबर लागल्यानंतर अनेक महिला, पुरुष, मुले, मुली, वृद्धांनी आपल्या आवडत्या खेळाडूंचे फोटो, विश्वचषकाची प्रतिकृती हातात घेऊन रस्ते व्यापून टाकले होते़ स्वागत कार्यक्रमाला जाण्यासाठी जर्मन संघासाठी मागविण्यात आलेल्या विशेष बसवर जर्मन टीमने मिळविलेल्या जेतेपदाचे वर्ष लिहिले होते़ जर्मनीने यापूर्वी १९५४, १९७४ आणि १९९० मध्ये अजिंक्यपद मिळविले आहे़ (वृत्तसंस्था)