शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

डीवाय स्टेडियमला हिरवा झेंडा

By admin | Updated: October 21, 2016 01:15 IST

१७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फीफा) कोच्चीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर नवी मुंबईच्या डॉ. डीवाय पाटील

मुंबई : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फीफा) कोच्चीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर नवी मुंबईच्या डॉ. डीवाय पाटील स्टेडियमलाही मान्यता दिली आहे. फीफा आणि स्थानिक आयोजन समितीच्या (एलओसी) २३ सदस्यांच्या संघाने कोच्ची आणि नवी मुंबईतील स्टेडियमची पाहणी केली. येथील तयारीविषयी समाधान व्यक्त केल्यानंतरया संघाने दोन्ही ठिकाणच्या स्टेडियमला सामना आयोजनासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे.फीफा आणि एलओसी संघाने बुधवारी कोच्चीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियमचा दौरा केला. तर, यानंतर गुरुवारी डीवाय पाटील स्टेडियमला भेट घेऊन तेथील तयारीची माहिती घेतली. एलओसीचे स्पर्धा निर्देशक झेवियर सेप्पी यांनी नवी मुंबईविषयी सांगितले की, ‘येथील तयारी खूप चांगल्या पध्दतीने झाली असून यासाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. सर्व व्यवस्थांकडे गांभिर्याने लक्ष दिले गेले आहे आणि सर्व गोष्टी नियंत्रणात आहेत. येथील सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत आणि मला आनंद आहे की एका मोठ्या स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी या स्टेडियमकडे दिली जात आहे. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र फुटबॉलच्या विकासाच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल असेल याचा आम्हाला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)१७ वर्षांखालील विश्वचषक सामन्यांच्या यजमानपदासाठी नवी मुंबईची निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मी फीफा आणि अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे मनापासून आभार मानतो.- डॉ. विजय पाटील, अध्यक्ष - डीवाय पाटील स्पोटर््स अ‍ॅकेडमी