शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला जलतरणमध्ये सुवर्ण पदक

By admin | Updated: February 2, 2015 03:27 IST

केरळमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांच्या जलतरण संघाने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये फ्रिस्टाईल प्रकारात राष्ट्रीय

पुणे : केरळमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांच्या जलतरण संघाने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये फ्रिस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. या संघाने ३ मिनिटे ४.५७ सेकंदांची प्रभावी वेळ दिली. या स्पर्धेतील पहिले पदक मिळविण्याचा मान वेटलिफ्टिंगमध्ये दीक्षा गायकवाड हिने मिळविला. दीक्षाने ५३ किलो वजन गटात रौप्य पदक पटकाविले.टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने अव्वल मानांकित दिल्ली संघाचा २-०ने धुव्वा उडवत खळबळजनक विजयाची नोंद केली. कुमार मंगलम टेनिस संकुलात महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे हिने प्रेरणा भांब्रीचा ६-१, ६-३ ने तर मीहिका यादव हिने करमन कौरचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.जलतरणमध्ये १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात जोत्स्ना पानसरे हिने १ मिनिट ०५.४६ सेकंद वेळ नोंदवत महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून दिले. २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये मोनिक गांधी हिने २ मिनिटे ९.४४ सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक पटकाविले. पुरुष गटात २०० मीटर फ्रिस्टाईलमध्ये सौरभ सानवेकरने २ मिनिटे ९. ४४ सेकंद वेळ नोंदवत कांस्य मिळवले. तर पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये फ्रीस्टाईल प्रकारात ३ मिनिटे ३३. १० सेकंद वेळ नोंदवत महाराष्ट्र संघाने रौप्यपदक पटकाविले.कुस्तीमध्ये ग्रिको रोमन प्रकारातील ५६ किलो वजनगटात महाराष्ट्राच्या वसंत सरवदे याने रौप्य पदक मिळविले. तर खोखोमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशाचा १ डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला. स्क्वॉशमध्ये महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू उर्वशी जोशी व जुई कलगूटकर यांनी महिला गटात तर अर्जुन अग्निहोत्री, ऐश्वरी सिंग व अभिनव सिन्हा यांनी पुरुष गटात आपापले सर्व सामने जिंकताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. (क्रीडा प्रतिनिधी)