शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘जायंट किलर’ कोरियाचा सलग दुसरा विजय

By admin | Updated: October 10, 2016 04:16 IST

सलामीला बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारतीय संघाला नमवण्याचा पराक्रम करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या कोरियाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा

अहमदाबाद : सलामीला बलाढ्य व संभाव्य विजेत्या भारतीय संघाला नमवण्याचा पराक्रम करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या कोरियाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना अर्जेंटिनाला ६८-४२ असे नमवले. या शानदार विजयासह कोरियाने १० गुणांसह ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. तर, भारत ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.कोरियाने अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरुवात करताना अर्जेंटिनाला दबावाखाली ठेवले. कोरियाच्या वेगवान आणि चपळ खेळापुढे हतबल झालेल्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडून अनेक चुका झाल्या. या जोरावर कोरियाने मोठी आघाडी घेत मध्यांतराला ४३-११ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले.परंतु, दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनाने पुनरागमनाचा चांगला प्रयत्न केला. त्यांनी चढाई आणि पकडीमध्ये चांगले प्रदर्शन करताना एकवेळ कोरियाला गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवाच्या जोरावर कोरियाने उत्कृष्ट खेळ करताना अर्जेंटिनाला अखेरपर्यंत डोके वर काढू दिले नाही. कोरियाने नियोजनबद्ध खेळाच्या जोरावर अननुभवी असलेल्या अर्जेंटिनावर तब्बल ५ लोण चढवले. त्याचवेळी, दुसऱ्या सत्रात आक्रमक पवित्रा घेतलेल्या अर्जेंटिनाने दोनवेळा लोण चढवून पुनरागमनाचा अपयशी प्रयत्न केला. त्या मानाने चढाईमध्ये अर्जेंटिनाने चांगली कामगिरी केली. त्यांनी २९ गुण चढाईमध्ये कमावताना बचावामध्ये केवळ ९ गुण मिळवले. दुसरीकडे कोरियाने ३६ गुण चढाईमध्ये जिंकताना बचावामध्ये १६ गुण कमावून बाजी मारली.भारताविरुद्ध कोरियाचा हीरो ठरलेल्या जँग कून ली याने या वेळी इतर खेळाडूंना संधी देताना ४ गुण मिळवले. तर, चेओल ग्यू शिन आणि ताइ बेओम किम यांनी खोलवर चढाया करताना अनुक्रमे ९ व ७ गुण कमावले. त्याचवेळी चान सिक पार्क, जाइ मिन ली आणि ग्यूंग ताइ किम या त्रिकूटाने भक्कम बचाव करत अर्जेंटिनाची हवा काढली. पराभूत संघाकडून फ्रँको कास्ट्रो (१०), नेहूएल विल्लमेयर (८) आणि युजेनियो पीटरमन (७) यांनी अपयशी झुंज दिली. (वृत्तसंस्था)