बीसीसीआयकडे गावस्कर यांनी केली

By Admin | Updated: April 28, 2015 00:29 IST2015-04-28T00:29:09+5:302015-04-28T00:29:09+5:30

‘आयपीएल’चे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणारे भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पगार म्हणून बीसीसीआयकडे एक कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली आहे.

Gavaskar told the BCCI | बीसीसीआयकडे गावस्कर यांनी केली

बीसीसीआयकडे गावस्कर यांनी केली

एक कोटी ९० लाख रुपयांची मागणी
नवी दिल्ली : गेल्या वर्षी यूएई व भारतात आयोजित इंडियन प्रीमिअर लीगच्या सातव्या पर्वादरम्यान बीसीसीआय ‘आयपीएल’चे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणारे भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पगार म्हणून बीसीसीआयकडे एक कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गावस्कर यांची ‘आयपीएल’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला गावस्कर यांना योग्य मानधन देण्याचे निर्देश दिले होते. कारण त्यावेळी गावस्कर यांना प्रसार माध्यमांचे करार (समालोचन व स्तंभ लेखन) रद्द करावे लागले होते. गावस्कर यांनी बीसीसीआयला पगाराबाबत पत्र दिले आहे.
कार्यकारी समितीच्या बैठकीत उपस्थित असलेले ‘बीसीसीआय’चे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, ‘गावस्कर यांनी बीसीसीआयला पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी एक कोटी ९० लाख रुपयांची मागणी केलेली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे बीसीसीआयला सेवा देताना गावस्कर यांना टीव्ही कॉमेन्ट्री, स्तंभ लेखन आणि क्रिकेट जाणकार म्हणून त्यांना भूमिका बजावता आली नाही. ’

Web Title: Gavaskar told the BCCI