गौरीला महिला एकेरीचा किताब

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:06+5:302015-08-02T22:55:06+5:30

Gaurila Women's Singles Book | गौरीला महिला एकेरीचा किताब

गौरीला महिला एकेरीचा किताब

>नवी दिल्ली: अव्वल मानांकित गौरी असीजाने आपले शानदार प्रदर्शन कायम राखताना सरळ डावात विजय नोंदवत योनेक्स सनराईज दिल्ली राज्य बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला़ तर आकाश यादवने मुलांच्या १७ वर्षांखालील गटाचा किताब आपल्या नावे केला़ गौरीने अंतिम फेरीत द्वितीय मानांकित प्रांजली तनेजाचा २५-२३, २१-१९ ने पराभव केला़ मुलांच्या १७ वर्षांखालील गटात द्वितीय मानांकित आकाशने प्रथम मानांकित राहुल पटेलचा २२-२४, २१-१२, २१-१७ अशा फरकाने हरवले़ मिश्र दुहेरीत उत्कर्ष अरोरा आणि रचिता सचदेव यांनी अक्षित पटेल व ईशा दास यांचा २१-९, २२-२० ने हरवले़ मुलींच्या अंडर १७ चा दुहेरीचा किताब काव्या गांधी आणि खुशबू कुमार यांनी पटकावला़ या अव्वल मानांकित जोडीने अनामिका कश्यप आणि नमिता पठानिया या द्वितीय मानांकित जोडीचा १७-२१, २१-९, २१-११ अशा फरकाने नमवले़

Web Title: Gaurila Women's Singles Book