शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपन बॅडमिंटन - सिंधूचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 01:54 IST

उपांत्यपूर्व लढतीत ताई जू कडून पराभूत

पॅरिस : जागतिक चॅम्पियन असेलेली भारतीय स्टार पी. व्ही. सिंधू हिला फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात शनिवारी पराभवाचे तोंड पाहावे लागले. कडव्या संघर्षानंतर सिंधू अव्वल मानांकित ताई जू यिंग हिच्याकडून एक तास १५ मिनिटांत १६-२१, २६-२४, १७-२१ अशा गुणफरकाने पराभूत झाली.

पाचव्या मानांकित सिंधूला चायनीज तायपेईच्या जूकडून दहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. सिंधू आणि जू यांच्यात जय-पराजयाचा रेकॉर्ड १०-५ असा आहे. सिंधूने जागतिक चॅम्पियनशिप जिंकण्याच्या मार्गात आशियाई सुवर्ण विजेती जू हिच्यावर मात केली होती. याशिवाय २४ वर्षांच्या सिंधूने २०१६ च्या आॅलिम्पिकदरम्यान जू यिंगवर मात केली होती. मागच्या वर्षी विश्व टूर फायनल्समध्येदेखील सिंधूने जूवर मात केली होती.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूचा बासेल येथे विश्व चॅम्पियनशिपचा किताब जिंकल्यापासून स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा सलग चौथा पराभव ठरला. शुक्रवारी सायना नेहवालदेखील पराभूत होऊन बाहेर पडली. सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्य फेरीतभारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीने आपली शानदार कामगिरी कायम करीत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ११ व्या क्रमांकाच्या या जोडीने डेन्मार्कच्या किम एस्ट्रप व एंडर्स रासमुसेन यांना फक्त ३९ मिनिटांत २१-१३, २२-२० असे पराभूत केले.

आता जपानच्या हिरोयुकी अ‍ॅन्डी-युता वाटाम्बे या पाचव्या मानांकित जोडीविरुद्ध त्यांना खेळावे लागणार आहे. यापूर्वी भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या दुसऱ्या मानांकित मोहम्मद अहसान व हेंड्रा सेतियावान या जोडीला पराभूत करीत खळबळ माजवून दिली होती.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू