मोदींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करा - हायकोर्टाचे आदेश

By Admin | Updated: September 15, 2015 03:06 IST2015-09-15T03:06:54+5:302015-09-15T03:06:54+5:30

राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ललित मोदींविरुद्ध नव्याने अश्विास प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिल्याने विरोधी गटात उत्साह संचारला आहे.

File a no-confidence motion against Modi - The High Court's order | मोदींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करा - हायकोर्टाचे आदेश

मोदींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करा - हायकोर्टाचे आदेश

जयपूर : राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ललित मोदींविरुद्ध नव्याने अश्विास प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिल्याने विरोधी गटात उत्साह संचारला आहे.
जिल्हा क्रिकेट संघटना, त्यांचे सचिव व आरसीएच्या कार्यकारी समिती सदस्यांसह २६ जणांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीच्या वेळी न्या. बेला
चतुर्वेदी यांनी ललित मोदी यांच्याविरुद्ध अविश्वास आणून दुसऱ्यांदा मतदान घ्यावे हा एकमेव तोडगा असल्याचे स्पष्ट केले. सवाई मानसिंग स्टेडियम येथे ९ मार्च रोजी झालेल्या सभेत अमिन पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अयोग्यपणे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: File a no-confidence motion against Modi - The High Court's order