FIFA World Cup 2022 Schedule: 32 संघ आणि एक ट्रॉफी! जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:05 PM2022-11-15T15:05:27+5:302022-11-15T15:05:41+5:30

आता जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे.

FIFA World Cup 2022 Schedule 32 teams are participating in the FIFA World Cup and this tournament will be held in Qatar, know the complete schedule | FIFA World Cup 2022 Schedule: 32 संघ आणि एक ट्रॉफी! जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक!

FIFA World Cup 2022 Schedule: 32 संघ आणि एक ट्रॉफी! जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक!

googlenewsNext

नवी दिल्ली : आता जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार 20 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. 

या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार असून सर्व संघाना 8 ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. स्पर्धेचा पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात खेळवला जाईल. तर स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या विश्वचषकात नेहमीप्रमाणे भारताला स्थान मिळाले नाही. कारण भारतीय संघ पुन्हा एकदा फीफा विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यामध्ये अपयशी झाला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पात्रता फेरीतच दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र कतार, सौदी अरेबिया, इराण, जपान, आणि दक्षिण कोरिया या आशियातील संघांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. 

फीफा विश्वचषक 2022चे ग्रुप 

  • ग्रुप ए - इक्वेडोर, नेदरलँड्स, सेनेगल, कतार
  • ग्रुप बी - इंग्लंड, वेल्स, अमेरिका, इराण
  • ग्रुप सी - पोलंड, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको
  • ग्रुप डी - फ्रान्स, ट्युनिशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क 
  • ग्रुप ई - कोस्टा रिका, जर्मनी, स्पेन, जपान
  • ग्रुप एफ - क्रोएशिया, मोरोक्को, बेल्जियम, कॅनडा 
  • ग्रुप जी - सर्बिया, ब्राझील, कॅमेरून, स्वित्झर्लंड
  • ग्रुप एच - उरुग्वे, कोरिया रिपब्लिक, पोर्तुगाल, घाना
     

फीफा विश्वचषक 2022चे वेळापत्रक
ग्रुप ए मधील सामने - 

20 नोव्हेंबर - कतार विरूद्ध इक्वेडोर, रात्री 9.30 वाजता, अल बेयट स्डेडियम.
22 नोव्हेंबर - सेनेगल विरूद्ध नेदरलॅंड्स, रात्री 9.30 वाजता, अल थुमामा स्टेडियम.
25 नोव्हेंबर - कतार विरूद्ध सेनेगल, सायंकाळी 6.30 वाजता, अल थुमामा स्टेडियम.
25 नोव्हेंबर - नेदरलॅंड्स विरूद्ध इक्वेडोर, रात्री 9.30 वाजता, खलीफा स्टेडियम.
29 नोव्हेंबर - इक्वेडोर विरूद्ध सेनेगल, रात्री 8.30 वाजता, खलीफा स्टेडियम.
29 नोव्हेंबर - नेदरलॅंड्स विरूद्ध कतार, रात्री 8.30 वाजता, अल बेयट स्डेडियम. 

ग्रुप बी - 
21 नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध इराण, संध्याकाळी 6:30 वाजता, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 
22 नोव्हेंबर - यूएसए विरुद्ध वेल्स, रात्री 12.30 वाजता, अल रेयान स्टेडियम
25 नोव्हेंबर - वेल्स विरुद्ध इराण, सकाळी 3.30 वाजता, अल रेयान स्टेडियम 
26 नोव्हेंबर - इंग्लंड विरूद्ध यूएसए, रात्री 12.30 वाजता, अल बेयट स्टेडियम 
30 नोव्हेंबर - इराण विरुद्ध यूएसए, रात्री 12.30 वाजता, अल थुमामा स्टेडियम 
30 नोव्हेंबर - वेल्स विरुद्ध इंग्लंड, रात्री 12.30, अल रेयान स्टेडियम

ग्रुप सी - 
22 नोव्हेंबर - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया, दुपारी 3.30 वाजता, लुसेल स्टेडियम 
22 नोव्हेंबर - मेक्सिको विरुद्ध पोलंड, सकाळी 9.30 वाजता, स्टेडियम 974 
26 नोव्हेंबर - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम 
27 नोव्हेंबर - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको, रात्री 12.30, लुसेल स्टेडियम 
1 डिसेंबर – पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, रात्री 12.30, स्टेडियम 974   
1 डिसेंबर - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको, रात्री 12.30, लुसेल स्टेडियम

ग्रुप डी - 
22 नोव्हेंबर - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया, संध्याकाळी 6:30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम 
23 नोव्हेंबर - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, रात्री 12.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 
26 नोव्हेंबर - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 
26 नोव्हेंबर - फ्रान्स विरूद्ध डेन्मार्क, रात्री 9.30 वाजता, स्टेडियम 974
30 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क, रात्री 8.30, अल जानोब स्टेडियम 
30 नोव्हेंबर - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स, रात्री 8.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम

ग्रुप ई -
23 नोव्हेंबर - जर्मनी विरुद्ध जपान, संध्याकाळी 6:30 वाजता, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 
23 नोव्हेंबर - स्पेन विरुद्ध कोस्टारिका, रात्री 9.30 वाजता, अल थुमामा स्टेडियम
27 नोव्हेंबर - जपान विरुद्ध कोस्टारिका, सकाळी 3.30 वाजता, अल रेयान स्टेडियम
28 नोव्हेंबर - स्पेन विरूद्ध जर्मनी, रात्री 12.30 वाजता, अल बेयट स्टेडियम 
2 डिसेंबर - कोस्टारिका विरुद्ध जर्मनी, रात्री 12.30 वाजता, अल बेयट स्टेडियम
2 डिसेंबर - जपान विरुद्ध स्पेन, दुपारी 12.30 वाजता, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

ग्रुप एफ - 
23 नोव्हेंबर - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया, दुपारी 3.30 वाजता, अल बेयट स्टेडियम
24 नोव्हेंबर - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, रात्री 12.30 वाजता, अल रेयान स्टेडियम
27 नोव्हेंबर - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, सायंकाळी 6.30 वाजता, अल थुमामा स्टेडियम 
27 नोव्हेंबर - क्रोएशिया विरूद्ध कॅनडा, रात्री 9.30 वाजता, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 
1 डिसेंबर - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम, रात्री 8.30 वाजता, अल रेयान स्टेडियम

ग्रुप जी - 
24 नोव्हेंबर - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून, सकाळी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम
25 नोव्हेंबर - ब्राझील विरुद्ध सर्बिया, रात्री 12.30 वाजता, लुसेल स्टेडियम 
28 नोव्हेंबर - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड, सायंकाळी 6.30 वाजता, स्टेडियम 974 
28 नोव्हेंबर - सर्बिया विरूद्ध कॅमरून, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम
3 डिसेंबर - कॅमेरून विरुद्ध ब्राझील, रात्री 12.30 वाजात, लुसेल स्टेडियम 
3 डिसेंबर - सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड, रात्री 12.30 वाजता, स्टेडियम 974

ग्रुप एच -
24 नोव्हेंबर - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया, संध्याकाळी 6.30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम 
24 नोव्हेंबर - पोर्तुगाल विरुद्ध घाना, रात्री 9.30 वाजता, स्टेडियम 974 
28 नोव्हेंबर - दक्षिण कोरिया विरुद्ध घाना, संध्याकाळी 6.30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम 
29 नोव्हेंबर - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे, रात्री 12.30 वाजता, लुसेल स्टेडियम
2 डिसेंबर - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 
2 डिसेंबर - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम

टॉप 16 
3 डिसेंबर - ग्रुप ए मधील अव्वल विरूद्ध ग्रुप बी मधील दुसरा संघ, रात्री, 8.30 वाजता, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
4 डिसेंबर - ग्रुप सी मधील अव्वल विरूद्ध ग्रुप डी मधील दुसरा संघ, रात्री 12.30 वाजता, अल रेयान स्टेडियम
4 डिसेंबर - ग्रुप डी मधील अव्वल विरूद्ध ग्रुप सी मधील दुसरा संघ, सकाळी 8.30 वाजता, अल थुमामा स्टेडियम
5 डिसेंबर - ग्रुप बी मधील अव्वल विरूद्ध ग्रुप ए मधील दुसरा संघ, रात्री 12.30 वाजता, अल बेयट स्टेडियम
5 डिसेंबर - ग्रुप ई मधील अव्वल विरूद्ध ग्रुप एफ मधील दुसरा संघ, सकाळी 8.30 वाजता, अल जनौब स्टेडियम
6 डिसेंबर - ग्रुप जी मधील अव्वल विरूद्ध ग्रुप एच मधील दुसरा संघ, रात्री 12.30 वाजता, स्टेडियम 974
6 डिसेंबर - ग्रुप एफ मधील अव्वल विरूद्ध ग्रुप ई मधील दुसरा संघ, रात्री 8.30 वाजता, एज्युकेश सिटी स्टेडियम
7 डिसेंबर - ग्रुप एच मधील अव्वल विरूद्ध ग्रुप जी मधील दुसरा संघ, रात्री 12.30 वाजता, लुसैल स्टेडियम

क्वार्टर फायनल 
9 डिसेंबर, सकाळी 8.30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम 
10 डिसेंबर, रात्री 12.30 वाजता, लुसेल स्टेडियम
10 डिसेंबर, सकाळी 8.30 वाजता, अल थुमामा स्टेडियम 
11 डिसेंबर, रात्री 12.30 वाजता, अल बेयट स्टेडियम

सेमीफायनलचे सामने
14 डिसेंबर - रात्री 12.30 वाजता, अल बेयट स्टेडियम
15 डिसेंबर - रात्री 12.30 वाजता, लुसेल स्टेडियम

तिसऱ्या क्रमांकासाठी सामना 
17 डिसेंबर - सकाळी 8.30 वाजता, खलीफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

फायनलचा सामना 
18 डिसेंबर - सकाळी 8.30 वाजता, लुसेल स्टेडियम

भारतात कुठे पाहायचे FIFA World Cup 2022चे सामने 
भारतात स्पोर्ट्स 18 चॅनलवर तुम्ही FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण पाहू शकता. याशिवाय FIFA विश्वचषक 2022 चे लाईव्ह स्ट्रीमिंग Voot वर पाहता येणार आहे. 

यावेळी विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस
अलीकडेच फीफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वाटण्यात येणारी बक्षीस रक्कम सुमारे 3,585 कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला 42 मिलियन म्हणजेच सुमारे 342 कोटी रूपये मिळणार आहेत. मागील अर्थात 2018च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम 4 मिलियन डॉलरहून अधिक आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: FIFA World Cup 2022 Schedule 32 teams are participating in the FIFA World Cup and this tournament will be held in Qatar, know the complete schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.