शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बागान बनला चौदाव्यांदा फेडरेशन कप चॅम्पियन

By admin | Updated: May 23, 2016 01:16 IST

जेजे लालपेखलुआचे शानदार २ गोल आणि सोनी नोर्डे याच्या जादुई कामगिरीने मोहन बागानने एजल एफसी संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळविताना १४ व्यांदा हीरो फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.

गुवाहाटी : जेजे लालपेखलुआचे शानदार २ गोल आणि सोनी नोर्डे याच्या जादुई कामगिरीने मोहन बागानने एजल एफसी संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळविताना १४ व्यांदा हीरो फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.येथे इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियममध्ये झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोलचे खाते उघडता आले नव्हते; परंतु उत्तरार्धात बागानने जबरदस्त खेळ करताना ४८, ५८, ७३, ८२ आणि ८८ व्या मिनिटाला गोल करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.बागानकडून सोनी नोर्डेने ४८ व्या मिनिटाला गोल केला. विक्रमजितने एजलच्या बॉक्समध्ये चेंडू पोहोचवला, तर स्ट्रायकरने जेजे लालपेखलुआकडून पास घेताना तो नोर्डेकडे दिला आणि नोर्डेने गोलरक्षकाला चकवताना गोल केला.दहा मिनिटांनंतर धनचंद्रसिंहने बागानतर्फे दुसरा गोल केला. कुत्सुमीच्या कॉर्नरवर धनचंद्रने हेडरद्वारे बागानची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला जेजेने गोल करीत बागानची आघाडी ३-० अशी पोहोचवली.८३ व्या मिनिटाला सोनी नोर्डेने डावीकडून अनेक खेळाडूंना चकवले आणि विक्रमजितकडे पास दिला आणि विक्रमजितने बागानतर्फे चौथा गोल केला. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना अजहरुद्दीन मलिकने डाव्या बाजूने दिलेल्या क्रॉसवर जेजे याने त्याचा दुसरा आणि बागानचा पाचवा गोल नोंदवला. (वृत्तसंस्था)