शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाच्या उत्साहात फॉल्कनरने उतरविले कपडे!

By admin | Updated: March 31, 2015 23:36 IST

विश्वचषक जिंकल्यानंतर आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोषी पार्टी केली. या पार्टीत अष्टपैलू जेम्स फॉल्कनरने आपले कपडे उतरविले होते,

मेलबोर्न : विश्वचषक जिंकल्यानंतर आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोषी पार्टी केली. या पार्टीत अष्टपैलू जेम्स फॉल्कनरने आपले कपडे उतरविले होते, अशी माहिती एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने दिली. रविवारी झालेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा सात गड्यांनी पराभव करीत विश्वचषक जिंकला होता. या विजयानंतर खेळाडूंनी रात्रभर आनंदोत्सव केला. याची माहिती हॅडिनने एका संकेतस्थळास दिली. त्यात त्याने सांगितले, की पार्टीत जेम्स फॉल्कनरने कपडे उतरवले होते. तो फोटो माझ्याकडे आहे; पण तो तुम्हाला दाखवू शकत नाही. माझ्यासोबत त्या वेळी प्रशिक्षकही होते आणि त्यांच्या हातात विश्वचषक होता, असे असतानाही ते काहीच बोलले नाहीत. माझ्यासोबत हेजलवूडसुद्धा होता. ज्यांनी ३० वर्षांत कधीही मद्याला हातसुद्धा लावला नाही. त्यांच्यासमोर प्यायला आम्हाला एका वाईट स्वप्नासारखे वाटत होते. तरीही आम्ही विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा केला. दरम्यान, न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्तिल आणि ग्रांट इलियट बाद झाल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त जल्लोष आणि खेळाडूंच्या व्यवहाराबाबत हॅडिन म्हणाला, की त्यांनी साखळी फेरीतील सामन्यात आमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला होता. त्यामुळे आम्ही ते बाद होण्याची वाटच बघत होतो. त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांना लक्ष्य करण्याची आम्ही संधीच बघत होतो. त्यामुळे आम्ही ते बाद झाल्यानंतर अतिउत्साह दाखवला. (वृत्तसंस्था)