शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक दिवस नवी आव्हाने घेऊन येतो

By admin | Updated: January 14, 2017 01:11 IST

ब्राझीलचा स्टार डिफेंडर असलेल्या डेव्हीड लुईस याने अनेक मोठ्या फुटबॉल जेतेपद पटकाविली आहेत. मात्र, प्रीमियर लीगच्या जेतेपदाने

ब्राझीलचा स्टार डिफेंडर असलेल्या डेव्हीड लुईस याने अनेक मोठ्या फुटबॉल जेतेपद पटकाविली आहेत. मात्र, प्रीमियर लीगच्या जेतेपदाने अद्याप त्याला हुलकावणीच दिली आहे. त्यामुळेच यंदाच्या मोसमात चेल्सीकडून त्याच्या खूप अपेक्षा आहेत. यंदा चेल्सीने सलग १३ विजयांची माळ गुंफताना सर्वांचे लक्ष वेधले. गेल्याच आठवड्यात टॉट्टनहॅम येथे त्यांची घोडदौड थांबल्यानंतर आता चेल्सी पुन्हा एकदा विजयी मार्गावर येण्यास उत्सुक असून, त्यांच्यापुढे आव्हान आहे ते लिसेस्टर सिटीचे. यानिमित्ताने लुईसशी केलेली बातचीत....स्पर्स येथे झालेल्या पराभवानंतर विजयी मालिका खंडित झाल्याने काही चेल्सी चाहते नाराज झालेत. त्यांच्यासाठी काय संदेश देशील? - चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. आता केवळ जानेवारी महिनाच सुरू आहे. प्रीमियर लीगमध्ये गुणतालिकेत मे महिन्यापर्यंत अव्वल राहणे हेच महत्त्वाचे असते. मी कोणालाही ही स्पर्धा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जिंकल्याचे पाहिले नाही. आम्ही चांगला खेळ करीत असून, आमचा आत्मविश्वास मजबूत आहे.पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी काय आवश्यक आहे?- नवीन काहीच नाही. आम्ही गुणतालिकेत अग्रस्थानी आहोत. सर्वत्र महत्त्वाचे म्हणजे हे अव्वल स्थान आम्हाला कायम ठेवायचे आहे. प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक सामना वेगळा आणि आव्हानात्मक असतो. जिंकणे कधीच सोपे नसते.टॉट्टनहॅम संघाला कडवा प्रतिस्पर्धी मानतोस का?- नक्कीच. मोसमाच्या सुरुवातीपासूनच जेतेपदासाठी कडवे प्रतिस्पर्धी म्हणून त्यांचे आव्हान होते. त्यांच्याकडे मौरिसिओ पोशेट्टीनो असून, ते शानदार प्रशिक्षक आहेत. आता तर, जेतेपदाच्या शर्यतीची सुरुवात झाली असल्याने प्रत्येक संघ सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेल.यंदा संघात मोठा अनुभव असल्याचे वाटते का?- हो. विजेतेपद जिंकण्याचा असल्याचा अनुभव असल्याने चेल्सी चांगली कामगिरी करीत आहे. परंतु, प्रत्येक दिवस नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक आव्हानासाठी सज्ज रहावे लागेल. (पीएमजी/ईएसपी)