युरो चषक २०१६ : स्लोवाकीची रशियावर २-१ ने मात

By Admin | Updated: June 15, 2016 21:27 IST2016-06-15T21:14:18+5:302016-06-15T21:27:56+5:30

वाइज आणि एम हॅमसक यांच्या भन्नाट गोलच्या जोरावर स्लोवाकीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रशियाचा २-१ने पराभव केला. स्लोवाकीने आज जबरदस्त आक्रमकता आणि सर्वोत्कृष्ट रणनीतीचे दर्शन घडविले

Euro Cup 2016: Slovakia beat Russia 2-1 | युरो चषक २०१६ : स्लोवाकीची रशियावर २-१ ने मात

युरो चषक २०१६ : स्लोवाकीची रशियावर २-१ ने मात

>ऑनलाइन लोकमत
लियोन, दि. १५ : व्ही वाइज आणि एम हॅमसक यांच्या भन्नाट गोलच्या जोरावर स्लोवाकीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रशियाचा २-१ ने पराभव केला. स्लोवाकीने आज जबरदस्त आक्रमकता आणि सर्वोत्कृष्ट रणनीतीचे दर्शन घडविले. विरोधी संघावर प्रतिहल्ले आणि बेजोड बचाव याच्या आधारावर रशियाविरुद्ध उत्कृष्ट विजय संपादन केला.
 
पहिल्या हापमध्ये व्ही वाइज आणि एम हॅमसक यांनी आक्रमण आणि बचावाचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून दिले. त्यामुळे स्लोवाकीच्या मधल्या फळीला गोल करण्याची संधी मिळत गेली. जरी चेंडूवर रशियाचे नियंत्रण अधिक काळ असले तरी ३२ व्या मिनिटाला व्ही वाइजने पहिला गोल करत सामन्यात स्लोवाकीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हापच्या ४५ व्या मिनिटाला एम हॅमसकने गोल करत आघाडी २-० ने केली. 
 
सामना संपण्यास काही वेळ उरला. ८०व्या मिनिटाला डी. ग्लुशकोने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवत रशियाकडून पहिला गोल  नोंदवला. 

Web Title: Euro Cup 2016: Slovakia beat Russia 2-1