शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

न्युझीलंडचा ७ विकेटने पराभव करत इंग्लडची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: March 30, 2016 22:37 IST

जेसन रॉयच्या तुफानी ७८ धावा आणि बेन स्टोक्सने घेतलेल्या ३ बळीच्या जोरावर इंग्लड संघाने न्युझीलंडचा ७ गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - जेसन रॉयच्या तुफानी ७८ धावा आणि बेन स्टोक्सने घेतलेल्या ३ बळीच्या जोरावर इंग्लड संघाने न्युझीलंडचा ७ गड्यांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. उद्या मुंबईत होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील विजेत्याशी त्यांचा अंतिम सामना खेळवला जाईल. न्युझीलडंच्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंगलडने जेसन रॉयच्या फटकेबाजीच्या जोरावर १७ चेंडू  आणि ७ विकेट राखून विजय संपादन केला.
 
जेसन रॉयने ४४ चेंडूचा सामना करताना २ षटकार आणि ११ चौकार लगावले आणि सामना एकहाती इंग्लडच्या बाजूने झुकवला. जेसन रॉय आणि हेल्स यांनी ८.२ षटकात १०च्या सरासरीने ८२ धावांची तडाखेबाज सलामी देत विजयाचा पाया रचला. हेल्स २० दादावर बाद झाला. तर मॉर्गनला आपले खातेही उघडता आले नाही. ज्यो रुट (२७) आणि बटलर (३२) यांनी विकेटची पडझडन होता संघाला अंतिम फेरित पोहचवले
 
त्यापुर्वी, शेवटच्या हाणामारीच्या षटकात इंग्लडच्या गोंलदाजांनी केलेल्या भेदक गोंलदाजीच्या जोरावर इंग्लडने न्युझीलंडला निर्धारीत २० षटकात १५३ धावांपर्यंतच रोखले. चांगल्या सुरवातीनंतर न्युझींडची मधली फळी ढासळल्यामुळे न्युझीलंड मोठ्या धावसंखेपासून वंचीत राहिला. टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना इंग्लंड वि. न्यूझीलंड संघात दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जात आहे. या महत्वपूर्ण सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यझीलंडने प्रथम फलंदाजी करत निर्धारीच २० षटकात १५३ धावा केल्या आहेत. विजयासाठी इंग्लडला निर्धारीत २० षटकात १५४ धावांची गरज आहे. न्युझीलंडकडून कर्णधार विलियमसन ३२ धावा काढून बाद झाला त्याला मोइन अलीने आपल्याच गोंलदाजीवर बाद केले. तर १२ चेंडूंत १५ धावा करणारा गपटील विलीच्या गोलंदाजीवर बटलरकडे झेल देत बाद झाला. मुनरोने ३२ चेंडूत एक षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. रॉस टेलरला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले तो ६ धावांवर बाद झाला. ल्युक राँचीने २ धावा केल्या. अंडरसन २८ धावार बाद होणारा न्युझीलंडचा सहावा फलंदाज ठरला. कर्णधार विलियमसन आणि मुनरो यांच्यात दुसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी झाली. ही न्युझीलंडकडून सर्वात मोठी भागीदारी होय.
बेन स्टोक्सने ४ षटकात ३ फलंदाजांना बाद केले. तर डेविड विले, क्रिस जॉर्डन, लेयाम प्लंकेट आणि मोइन अली यांनी प्रत्येकी एका फंलदाजाला बाद केले.