शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय गोलंदाजांकडून बाउन्सरचा प्रभावी वापर

By admin | Updated: March 23, 2015 01:31 IST

सर्वसाधारण विचार करता कमकुवत मानल्या जाणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विश्वकप क्रि केट स्पर्धेत छाप सोडली आहे.

सिडनी : सर्वसाधारण विचार करता कमकुवत मानल्या जाणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी विश्वकप क्रि केट स्पर्धेत छाप सोडली आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या ७० पैकी ४३ फलंदाजांना माघारी परतवण्याची कामगिरी केली आहे. भारतीय संघ आॅस्ट्रेलियात दाखल झाला तेव्हापासून भारतीय फलंदाज उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीवर शॉट पिच चेंडूंना कसे सामोरे जाणार, असा प्रश्न विचारला जात होता, पण तीन महिन्यांच्या कालावधीनंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या माराचा योग्य वापर करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. भारताने आतापर्यंत सात सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाच्या ७० विकेट घेतल्या आहेत. त्यातील ४३ विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. त्यापैकी २५ फलंदाज आखूड टप्प्याच्या चेंडूंवर बाद झाले आहेत, हे विशेष. काही दिवसांपूर्वी कर्णधार धोनीने तीन वर्षांपूर्वीच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्याला ‘आयसीसी’ने प्रत्येक षटकात दोन बाऊन्सरला परवानगी देण्याबाबत विचारण्यात आले होते. धोनी म्हणाला होता, ‘कुणीतरी मला प्रतिषटक दोन बाऊन्सरच्या नियमावर प्रतिक्रिया विचारत होता. मी उत्तर दिले होते, ‘एक बाऊन्सर व्यवस्थितपणे टाकता येत नाही, मग दोन बाऊन्सर काय मी घरी घेऊन जाणार.’ त्यावेळी धोनीच्या या व्यंगात्मक उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी कसून मेहनत घेतली. आॅस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांना अधिक बळी मिळतात, हा अनुभव आहे, पण यापूर्वी भारतीय गोलंदाजांना येथील खेळपट्ट्यांचा कधीच एवढा प्रभावी वापर करता आलेला नाही. भारतातर्फे मोहम्मद शमीने १७ विकेट घेतल्या आहेत, तर उमेश यादवने १४ आणि मोहित शर्माने ११ बळी घेतले आहेत. या स्पर्धेत मोहम्मद शमीच्या स्थानी एकमेव सामना खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतला आहे. त्यात मोहितने बाऊन्सरचा प्रभावी वापर केला आहे. मोहित १३० किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करताना अचानक १४० किलोमीटर प्रति तास वेगाने मारा करू शकतो. पाकचा माजी वेगवान गोलंदाज व यूएई संघाचा प्रशिक्षक आकीब जावेदने पर्थमध्ये म्हटले होते की, ‘मोहितचा बाऊन्सर सर्वांत प्रभावी आहे.’ कर्णधार धोनीचेही मोहितबाबत असेच मत आहे. (वृत्तसंस्था)