शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य महाराष्ट्राची ‘डबल’ सलामी

By admin | Updated: June 10, 2016 03:39 IST

संघांनी आपापल्या गटात अपेक्षित विजय मिळवताना २७व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली


मुंबई : बलाढ्य व संभाव्य विजेत्या महाराष्ट्राच्या दोन्ही किशोर व किशोरी संघांनी आपापल्या गटात अपेक्षित विजय मिळवताना २७व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. किशोर संघाने ‘अ’ गटात गुजरातचा, तर किशोरी संघाने दिल्लीचा सहजरीत्या धुव्वा उडवला.
भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर संघाने पहिल्याच दिवशी दमदार विजय मिळवताना इतर संघांना धोक्याच्या इशारा दिला. गुजरातला खो-खोचे धडे देताना महाराष्ट्राच्या किशोरांनी ११-६ असा एक डाव व ५ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्याच डावात ११-२ अशी एकतर्फी आघाडी घेत महाराष्ट्राने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. तर यानंतर गुजरातला स्थिरावण्यास एकही संधी न देता महाराष्ट्राने एक डाव राखून बाजी मारली. आदित्य गणपुले (४.१० मि. आणि ३ बळी) याने अष्टपैलू खेळ करीत निर्णायक कामगिरी केली. तर शुभम थोरात व प्रथमेश मोरे यांनी जबरदस्त संरक्षण करताना गुजरातच्या खेळाडूंना चांगलेच पळवले. चंदू चावरेने आक्रमणात चमक दाखवली.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या किशोरी संघानेदेखील एकतर्फी विजयी सलामी देताना दिल्लीला १७-२ असे एक डाव व तब्बल १५ गुणांनी लोळवले. पहिल्या डावातच महाराष्ट्राने भलीमोठी आघाडी घेत दिल्लीच्या आव्हानातली हवा काढली. (क्रीडा प्रतिनिधी)
अश्विनी पारसे, हर्षदा करे यांचे मजबूत संरक्षण आणि दीक्षा सोनसूरकर, कृतिका मगदुम यांचे वेगवान आक्रमण यापुढे दिल्लीचा काहीच निभाव लागला नाही.