शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

हुल्लडबाजीला गांभीर्याने घेऊ नका - धोनी

By admin | Updated: October 6, 2015 12:24 IST

कटकमधील प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा सर्वच स्तरातून निषेध दर्शवला जात असताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने या हुल्लडबाजीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

कटक, दि. ६ - भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा सर्वच स्तरातून निषेध दर्शवला जात असताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने या हुल्लडबाजीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हटले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने हा प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

सोमवारी कटक येथील दुस-या टी - २० सामन्यात भारताच्या निराशाजनक कामगिरीमुळे नाराज प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये हुल्लडबाजी करत मैदानावर प्लास्टीकच्या बॉटल्स फेकल्या. या गोंधळामुळे सामना काही वेळ थांबवावा लागला होता.  भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या या कृतीचा आता सर्वच स्तरातून निषेध होत आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मते या घटनांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ' आम्ही एकदा वायजेंग येथे सामना खेळत होतो, तिथेही भारत सामना जिंकत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या पाठिराख्यांनी मैदानावर बॉटल फेकल्या होत्या. सुरुवात एका बॉटलने झाली पण नंतर प्रेक्षकांना यात मजा येत होती अशी आठवणही धोनीने सांगितली. खेळाडूंच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड झाली नव्हती असे त्याने स्पष्ट केले.  टी -२० मालिकेत दुस-या सामन्यातील पराभवासाठी धोनीने फलंदाजांना जबाबदार धरले आहे. टी - २० सामन्यात डोकं लावून खेळण्यात उपयोग नाही हा अनुभव मी पुन्हा एकदा घेतला असेही धोनीने नमूद केले. 

फाफ डू प्लेसिसने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. मी गेली पाच वर्ष भारतात खेळलोय, पण अशी घटना पहिल्यांदाच घडली. ७२ दिवसांच्या भारत दौ-यात ही पहिली व शेवटची घटना असावी अशी आशाही त्याने व्यक्त केली.  या घटना भारतातच नव्हे तर सगळीकडेच होत असतात, लोकांमध्ये खेळाप्रति एक जोश व उत्साह असतोच असे प्लेसिसने सांगितले.