शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाआड डोपिंग दडवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 04:51 IST

डाचे अध्यक्ष बांका यांचा खेळाडूंना इशारा : बचावाची संधी नाही

वालंडन: कोरोना व्हायरसच्या आड डोपिंगपासून पळ काढू नका, असा इशारा देत विश्व डोपिंगविरोधी एजन्सीचे (वाडा) अध्यक्ष विटोल्ड बांका यांनी डोपिंगबाबत कुठलीही माहिती दडविणे म्हणजे स्वत:शी खोटे बोलणे होय, असे म्हटले आहे.कोरोनामुळे खेळाडूंची शारीरिक चाचणी थांबू शकते मात्र वाडा तसेच प्रत्येक देशातील राष्टÑीय डोपिंग एजन्सीकडे अशी काही साधने आहेत ज्यामुळे डोपिंगला आळा घालता येणे शक्य असल्याचे बांका यांनी म्हटले आहे.कॅनडा आणि रशियाने कोरोनामुळे डोप परीक्षण थांबवत असल्याची घोषणा केली. ब्रिटनच्या डोपिंग विरोधी एजन्सीनही चाचणी परीक्षण कमी केले आहेत. बांका यांनी १ जानेवारी रोजी क्रेग रीडी यांच्याकडून वाडाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. कोरोनाचे संकट लवकरच संपेल आणि वाडाचे परीक्षण पूर्वीप्रमाणे सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, ‘डोपिंग परीक्षण हे आमचे एकमेव शस्त्र नाही. अन्य स्त्रोतही आहेत. खेळाडूंचा जैविक पासपोर्ट आम्हाला त्यांच्याबाबत सर्व माहिती पुरवतो. याशिवाय खेळाडूंच्या नमुन्यांचे दीर्घकालिन विश्लेषण करण्याचीही सोय आहे. आम्ही खेळाडूंच्या परीक्षणासाठी जाणार नसू तरी खेळाडूंनी स्वत:च्या वास्तव्याचे ठिकाण सांगणे बंधनकारक आहे.’ बांका हे सर्वच क्रीडा महासंघासोबत चर्चा करीत आहेत. कोरोनामुळे डोपिंग परीक्षण थांंबले असले तरी खेळाडूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय डोपिंग एजन्सीची देखील आहे, हे प्रत्येक देशाला पटवून देत आहेत. (वृत्तसंस्था)‘ कोरोना कुणालाही डोपिंगपासून बचावाची संधी देत नाही. ही धोका देण्याची वेळ आहे, असा विचार खेळाडूंनी करू नये. वाडाद्वारे अशा खेळाडूंना पकडण्यासाठी दुसऱ्या उपाययोजना करता येतील.’- विटोल्ड बांका, अध्यक्ष, वाडा