जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: March 31, 2016 03:09 IST2016-03-31T03:09:00+5:302016-03-31T03:09:00+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने विजयी घोडदौड कायम राखत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला गटात पाचव्या

Djokovic quarter-finals | जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

मियामी : जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याने विजयी घोडदौड कायम राखत मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला गटात पाचव्या मानांकित सिमोना हालेप हिला पराभवाचा सामना करावा लागला.
जोकोविचने चौथ्या फेरीत आॅस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएम याला ६-३, ६-४ अशी सहज मात देत आठव्या फेरीत प्रवेश केला. हा सामना तब्बल १ तास ५० मिनिटे चालला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत गणराज्यच्या थॉमस बर्डिचशी होईल. बर्डिचने फ्रान्सच्या रिचार्ड गास्को याला ६-४, ३-६, ७-५ अशी मात दिली. अन्य सामन्यात केई निशिकोरीने स्पेनच्या रॉबर्टो बटीस्टा याला ६-२, ६-४ अशी सहज मात दिली. निशिकोरीचा पुढचा सामना फ्रान्सच्या गाएल मोनाफिल्स यांच्याशी होईल.

Web Title: Djokovic quarter-finals