नेहराच्या अनुभवाचा लाभ मिळत आहे : धोनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2015 01:22 IST2015-04-27T01:22:07+5:302015-04-27T01:22:07+5:30

वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या अनुभवाचा आम्हाला लाभ मिळत आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. शनिवारी किंग्ज

Dhoni is getting the benefit of the experience: Dhoni | नेहराच्या अनुभवाचा लाभ मिळत आहे : धोनी

नेहराच्या अनुभवाचा लाभ मिळत आहे : धोनी

चेन्नई : वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या अनुभवाचा आम्हाला लाभ मिळत आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ९७ धावांनी विजय मिळविल्यानंतर धोनी पत्रकार परिषदेत बोलत होता. हा विजय आमच्यासाठी सर्वांत सोपा विजय होता, असेही धोनी म्हणाला.
धोनीने सांगितले की, ‘आयपीएल स्पर्धेतील हा सर्वांत सोपा विजय होता. फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळत होती आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला.
ब्रँडन मॅक्युलमने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत ६६ धावांची खेळी केली. धोनीने नाबाद ४१ धावांचे योगदान दिले. चेन्नईने ३ बाद १९२ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा डाव ९ बाद ९५ धावांत रोखला. कारकिर्दीतील १०० वा सामना खेळणाऱ्या रवींद्र जडेजाने २२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले.

Web Title: Dhoni is getting the benefit of the experience: Dhoni