शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

विकास उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 23, 2016 01:52 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता विकास कृष्णा याने येथे सुरू असलेल्या विश्व आॅलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या ७५ किलोगटात गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली

अझरबैजान : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता विकास कृष्णा याने येथे सुरू असलेल्या विश्व आॅलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या ७५ किलोगटात गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. आॅगस्ट महिन्यात आयोजित रिओ आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यापासून तो आता एक पाऊल दूर आहे.दुसरा मानांकित विकास याने जॉर्जियाचा क्वाचाल्दजे जाल याच्यावर ३-० असा विजय साजरा करून अखेरच्या ८ खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. उपांत्यपूर्व सामन्यात विकासला कोरियाच्या बॉक्सरचे आव्हान असेल. याआधी मनोजकुमार (६४ किलो) तसेच सुमीत सांगवान (८१ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी या तिघांना सेमीफायनलमध्ये स्थान मिळवावे लागेल. ४९ किलोगटात राष्ट्रकुल रौप्यपदकविजेता एल. देवेंद्रोसिंग याने ४९ किलोगटात आधीच सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. या गटात केवळ दोन बॉक्सरचा कोटा असल्याने रिओसाठी पात्रता मिळविण्याकरिता अंतिम फेरी गाठणे अनिवार्य आहे. बुधवार हा विश्रांतीचा दिवस होता. उद्या (गुरुवारी) विकास, सुमीत आणि मनोज उपांत्यपूर्व सामने खेळतील. देवेंद्रो शुक्रवारी उपांत्य सामन्यात उतरेल. त्याला स्पेनचा सॅम्युअल हेदेरिया याच्याविरुद्ध लढत द्यायची आहे. (वृत्तसंस्था)