विजयी निरोपाचा ‘बांगला’चा निर्धार

By Admin | Updated: March 26, 2016 02:14 IST2016-03-26T02:14:36+5:302016-03-26T02:14:36+5:30

भारताविरुद्ध अटीतटीच्या लढतीत पराभूत झालेल्या बांगला देशाला टी-२० विश्वचषकात आज, शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध औपचारिक सामना खेळायचा आहे; पण जेतेपदाचा प्रबळ

The determination of the victorious 'Bangala' of victory | विजयी निरोपाचा ‘बांगला’चा निर्धार

विजयी निरोपाचा ‘बांगला’चा निर्धार

कोलकाता : भारताविरुद्ध अटीतटीच्या लढतीत पराभूत झालेल्या बांगला देशाला टी-२० विश्वचषकात आज, शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध औपचारिक सामना खेळायचा आहे; पण जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या न्यूझीलंडला नमवूनच निरोप घेऊ, असा निर्धार या संघाने व्यक्त केला. बांगला देशसाठी हे आव्हान सोपे नाही. भारताकडून एका धावेने पराभूत होताच बांगला देशच्या उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. तिन्ही सामन्यांत हा संघ पराभूत झाला. दुसरीकडे न्यूझीलंड संघ सर्वच लढती जिंकला आहे. ईडनवर बांगला देशचा हा दुसरा सामना असून, प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर त्यांचा विजय विसंबून असेल.

Web Title: The determination of the victorious 'Bangala' of victory