शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

गोलंदाजांची भूमिका ठरणार निर्णायक !

By admin | Updated: March 31, 2016 03:07 IST

भारत-विंडीजदरम्यान रंगणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी मैदान सजले आहे. माझ्या मते, उपांत्य फेरी गाठणारे सर्वच संघ दावेदार होते. या चारही संघांनी सकारात्मक कामगिरी करून

सौरव गांगुली लिहितो़..भारत-विंडीजदरम्यान रंगणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी मैदान सजले आहे. माझ्या मते, उपांत्य फेरी गाठणारे सर्वच संघ दावेदार होते. या चारही संघांनी सकारात्मक कामगिरी करून हे स्थान गाठले. या चारही संघांनी फिरकीला यशस्वीपणे तोंड दिले. फिरकी गोलंदाजी ही भारतीय उपखंडाची खरी ओळख आहे. इंग्लंडचा अपवाद वगळता सर्वच संघांत चांगले फिरकी गोलंदाज आहेत. भारत-आॅस्ट्रेलिया सामन्याबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख झाला; पण माझ्या मते, कांगारूंना येथे खेळताना फिरकीविरुद्ध चांगलेच झगडावे लागते.विंडीजकडे चांगलेच स्पिनर आहेत. सुलेमान बेन आणि सॅम्युअल बद्री यांना बळी मिळत आहेत. वानखेडेची खेळपट्टी टणक राहल्यास विंडीजचे फिरकी गोलंदाज परिस्थितीचा लाभ घेण्याची एकही संधी सोडणार नाहीत.दोन्ही संघांची आणि त्यातही भारताची भिस्त फलंदाजीवर अधिक असेल. विराटचा अपवाद वगळात अन्य फलंदाज फॉर्ममध्ये नाहीत. टणक खेळपट्टीवर वेळेची मागणी पाहता, अन्य फलंदाज भारतासाठी धावा काढतील, अशी मला आशा आहे.कोहलीच्या कामगिरीची फार चर्चा सुरू आहे. गुरुवारी विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, तर अन्य खेळाडूंना ही उणीव भरून काढावीच लागेल. भारतीय संघाच्या कामगिरीची तर चर्चा होतच आहे; पण विंडीजची कामगिरी नजरेआड करता येणार नाही. विंडीजने आपल्या गटात द. आफ्रिका, लंका आणि इंग्लंडला धूळ चारली आहे.टी-२० फॉरमॅटच्या दावेदारांबद्दल मी अधिक भाष्य करणार नाही. त्या दिवशीच्या खेळावर बरेच काही अवलंबून असते. ‘गेल विरुद्ध विराट’ असाही माहोल तयार केला जात आहे; पण संघाच्या विजयात अन्य खेळाडूंची भूमिकाही तितकीच निर्णायक असते. दोन्ही संघांना चांगल्या गोलंदाजांची साथ लाभेल; त्यामुळे गेलला बुमराह, आश्विन आणि नेहरा यांच्याकडून कडवे आव्हान मिळेल. बद्री आणि बेन हे भारतीय फलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करतील. जखमी झाल्याने युवराज स्पर्धेबाहेर पडला आहे. रहाणे त्याचा उत्तम पर्याय असू शकतो. संघाची मधली फळी फॉर्ममध्ये नाही; त्यामुळे अशा स्पर्धेत रहाणेसारख्या दर्जेदार फलंदाजाची भूमिका मोलाची ठरेल. संघाला एक फिरकीपटू अधिक खेळवायचा असेल, तर बुमराहला बाहेर बसवून एक मध्यम जलद गोलंदाज खेळविता येईल. विकेट बॅटिंगसाठी योग्य असेल, तर युवीची जागा रहाणे घेऊ शकतो.(गेमप्लान)