शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

दरपाळे गावक-यांचा ‘यूएई’ला पाठिंबा

By admin | Updated: February 28, 2015 01:33 IST

विश्वचषक स्पर्धेतील आज, शनिवारी रंगणाऱ्या भारत वि. संयुक्त अरब अमिरात (यूएई) सामन्यामध्ये भारतीय चाहत्यांनी संघाचा सलग तिसरा विजय गृहीत धरला आहे.

रोहित नाईक, मुंबईविश्वचषक स्पर्धेतील आज, शनिवारी रंगणाऱ्या भारत वि. संयुक्त अरब अमिरात (यूएई) सामन्यामध्ये भारतीय चाहत्यांनी संघाचा सलग तिसरा विजय गृहीत धरला आहे. असे असले तरी वसई तालुक्यातील नायगाव-दरपाळे गाव मात्र यूएईच्या विजयासाठी प्रार्थना करीत आहे आणि याला कारण आहे ते यूएईचा यष्टिरक्षक-फलंदाज ‘स्वप्निल पाटील’. मूळचा दरपाळे गावचा असलेल्या स्वप्निलची २०१० मध्ये यूएई संघात वर्णी लागली आणि तेव्हापासून येथे यूएई संघाचे पाठीराखे तयार झाले. गेल्यावर्षी बांगलादेशमध्ये पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच स्वप्निल खेळला. त्यावेळी दरपाळे गावकऱ्यांनी यूएईचे सर्व सामने मोठ्या पडद्यावर पाहिले. आजचा सामना सकाळी असल्याने मैदानात मोठा पडदा लावणे शक्य नाही, तरी आम्ही एका हॉलमध्ये एकत्रितपणे सामन्याचा आनंद घेऊ, असे दरपाळे येथील क्रिकेटप्रेमींनी ‘लोकमत’ला सांगितले.विश्वचषकाला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच वसई-नायगावमध्ये स्वप्निलला शुभेच्छा देणारे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे वसई-नायगावचा पूर्ण पाठिंबा यूएईला असणार हे स्पष्टच होते. मात्र, भारत विरुद्धच्या सामन्यासाठीदेखील आम्ही यूएईलाच पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्याने आज वसईतील एक गाव पूर्णपणे यूएईचा पाठीराखा असेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच यूएईच्या प्रत्येक चौकार-षट्कारावर किंवा भारताच्या प्रत्येक विकेटवर दरपाळे गावात जल्लोष झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. शिवाय जर का यूएईने सर्वांना चकीत करून भारताला धक्का दिला तर नक्की दिवाळी साजरी केली जाईल. त्यानुसार फटाक्यांचीदेखील तयारी झाली असल्याचे समजले.