शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा घेण्यापूर्वी कॅलेंडर तयार करा

By admin | Updated: April 24, 2015 00:30 IST

राष्ट्रीय पॅराअ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील अनागोंदीपासून धडा घेऊन क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना स्पर्धेचे आयोजन करण्याआधी योग्य कॅलेंडर तयार करण्याचे नवे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रीय पॅराअ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील अनागोंदीपासून धडा घेऊन क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना स्पर्धेचे आयोजन करण्याआधी योग्य कॅलेंडर तयार करण्याचे नवे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने काढलेल्या पत्रकानुसार स्पर्धा आयोजनाची प्राथमिक जबाबदारी क्रीडा महासंघांची असेल. खेळाडूंना सर्वोत्कृष्ट कामगिरी करता यावी, यासाठी स्पर्धेच्या यशस्वी संचालनात सर्व उपाययोजना करण्यात यावी. प्रत्येक राष्ट्रीय महासंघाला दर वर्षी सिनिअर, ज्युनिअर आणि सब-ज्युनिअर स्पर्धांचे आयोजन करणे अनिवार्य असेल. काही महासंघ देशात झोनल चॅम्पियनशिप तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचेदेखील आयोजन करू शकतात. स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी मंत्रालयाला वारंवार मिळतात. यामुळेच मंत्रालयाने विविध स्पर्धा आयोजनासाठी हे नवे निर्देश दिले.स्पर्धेचे आयोजन करणे आणि व्यवस्थापन करणे, ही जबाबदारी क्रीडा महासंघांची आहे. खेळाडू सहजपणे पोहोचू शकतील, अशा स्टेडियम किंवा इन्डोअर स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. विकलांग खेळाडूंची स्पर्धा असेल, तर विशेष व्यवस्था असावी. खेळाडूंसाठी सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात. स्पर्धा सुरू होण्याआधी क्रीडा महासंघांच्या सदस्यांनी आयोजन स्थळाचे निरीक्षण करावे. खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी स्थळ असावे. पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा, कॉफी आणि नाश्ता उपलब्ध असावा. याशिवाय, स्वच्छ टॉयलेट असावे. विकलांग खेळाडूंसाठी त्यांना उपयुक्त ठरतील, असे टॉयलेट तयार करावेत. मुलामुलींसाठी वेगवेगळ्या चेंजिंग रूम असाव्यात. (वृत्तसंस्था)