शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोपा अमेरिका फुटबॉल : अर्जेंटिना अंतिम फेरीत

By admin | Updated: June 22, 2016 18:25 IST

एक गोलच्या जोरावर गतउपविजेत्या अर्जेंटिना संघाने अमेरिकाचा ४-० गोलने पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत

ह्युस्टन (टेक्सास), दि. 22 - बार्सिलोनाचा स्टार खेळाडू गोंजालो हिग्वेनचे अफलातून दोन गोल आणि लियोनल मेस्सी व एजिक्वील लावेजीने केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर गतउपविजेत्या अर्जेंटिना संघाने अमेरिकाचा ४-० गोलने पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सान्याच्या सुरुवातीपासूनच अर्जेंटिना संघाने वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सुरू केला. अमेरिकन खेळाडूंना त्यांच्या प्रेक्षकांचा जरी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत होता, तरी अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आक्रमक खेळ सुरू ठेवला. पहिल्या हाफच्या तिसऱ्या मिनिटाला फॉरवर्ड एजिक्वील लावेजीने हेडरने गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. त्यांनतर कर्णधार मेस्सीने ३२ व्या मिनिटाला गोल करून या स्पर्धेतील आपला पाचवा गोल नोंदविला. विश्रांंतीसाठी खेळ थांबला तेव्हा अर्जेंटिना २-० गोलनने आघाडीवर होते. पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा अमेरिका संघाच्या पाठीराख्यांना आपला संघ पुनरागमन करेल, असे वाटत होते. पण, त्यांचा अंदाज साफ चुकला. ५० व्या मिनिटाला पुन्हा अर्जेंटिनाच्या गोंजालो हिग्वेनने गोल करून आपल्या संघाला ३-० अशी आघाडी दिली. अमेरिकन खेळाडूंनी अनेक चाली रचल्या, पण अर्जेंटिनाच्या बचावफळीने त्यांचे आक्रमण परतावून लावले. ८६ व्या मिनिटाला हिग्वेनने या सामन्यात आपला दुसरा, तर संघाचा चौथा गोल केला. अर्जेंटिनाने केलेले चार गोल अमेरिकेच्या खेळाडूंना उरलेल्या वेळेत ना बरोबरी ना विजयी मिळवून देऊ शकत होते. अर्जेंटिना संघाला अंतिम सामन्यात चिली आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाबरोबर खेळावे लागणार आहे. 

मेस्सी टॉप गोल स्कोअरर ...

मेस्सीने या सामन्यात एक गोल करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील आपला ५५ वा गोल केला. हा गोल नोंदवून मेस्सीने गॅब्रियन बतिस्तुताचा विक्रम मोडीत काढला. बतिस्तुताचे ७८ सामन्यांत ५४ गोल होते.