शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कुक @ 10000

By admin | Updated: May 31, 2016 03:39 IST

इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक याने आज येथे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करतानाच अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यात १० हजार धावा कमी वयात करण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे.

इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुक याने आज येथे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करतानाच अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यात १० हजार धावा कमी वयात करण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे.चेस्टर ली स्ट्रीट : इंग्लंडचा संघ जेव्हा श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना उतरला तेव्हा कुकला १0 हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ५ धावांची गरज होती. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकात नवुन प्रदीपला चौकार मारत ही कामगिरी केली. तो कसोटी क्रिकेटमध्ये १0 हजार धावा करणारा जगातील १२ वा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज आहे.कुक अद्याप ३१ वर्षे १५७ दिवसांचा आहे आणि अशा प्रकारे त्याने सर्वांत कमी वयात १0 हजार धावा पूर्ण करण्याचा नवीन विक्रम केला. याआधी विक्रम तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ही कामगिरी ३१ वर्षे ३२६ दिवसांत केली होती. विशेष म्हणजे सर्वांत कमी वयात ७ हजार, ८ हजार, ९ हजार आणि आता १0 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही कुकच्या नावावर नोंदवला गेला. तथापि, तेंडुलकरने १९५ डावांत ही कामगिरी केली होती. हा विक्रम सचिन तेंडुलकरसह ब्रायन लारा आणि कुमार संगकारा यांच्या नावावर संयुक्तरीत्या आहे. कुकला १0 हजार धावा पूर्ण करण्यासाठी २२९ वा डाव खेळावा लागला. एवढेच नव्हे, तर १0 हजार धावांपर्यंत पोहोचण्यासाठीही कुकने कमी वेळ घेतला. भारताविरुद्ध २00६ मध्ये कसोटी कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या या फलंदाजाने ३७४३ दिवसांत ही किमया केली. त्याने अन्य एक भारतीय राहुल द्रविडचा विक्रम मोडला. द्रविड ४२९८ दिवसांत १0 हजार धावा करणारा फलंदाज ठरला होता. आतापर्यंत ज्या फलंदाजांनी कसोटी सामन्यात १0 हजार पूर्ण केल्या आहेत त्यात भारत आणि आॅस्ट्रेलियाचे प्रत्येकी ३, विंडिज व श्रीलंकेचे प्रत्येकी २ फलंदाज आहेत, तसेच द. आफ्रिका आणि इंग्लंडचा प्रत्येकी १ फलंदाज आहे.कसोटीत १0 हजारांपेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज :सचिन तेंडुलकर (१५,९२१ धावा),रिकी पाँटिंग (१३,३७८ धावा),जॅक कॅलिस (१३२८९),राहुल द्रविड (१३,२८८ धावा), कुमार संगकारा (१२,४00 धावा), ब्रायन लारा (११,९५३ धावा), चंद्रपॉल (११,८६७ धावा), माहेला जयवर्धने (११,८१४ धावा), अ‍ॅलन बॉर्डर (११,१७४ धावा), स्टीव्ह वॉ (१0,९२७ धावा),सुनील गावस्कर (१0,१२२ धावा),अ‍ॅलेस्टर कुक (१0,0१८ धावा). हे सर्व रेकॉर्ड इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या चहापानापर्यंत आहे.