शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

सातत्य, एकाग्रतेमुळे सुवर्ण जिंकलो!

By admin | Updated: October 7, 2014 03:04 IST

नेमबाज जीतू राय याच्यासाठी २०१४ हे वर्ष खास आहे. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाची लयलूट करणा-या जीतूने सोमवारी यशाचे रहस्य सांगितले.

मुंबई : नेमबाज जीतू राय याच्यासाठी २०१४ हे वर्ष खास आहे. तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाची लयलूट करणा-या जीतूने सोमवारी यशाचे रहस्य सांगितले. खेळातील सातत्य आणि एकाग्रता यामुळेच यश मिळवणे शक्य झाल्याचे तो म्हणाला. आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या (ओजीक्यू) वतीने मुंबईत आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओजीक्यूचा अ‍ॅम्बेसेडर म्हणून बॉलिवूड स्टार सैफ अली खान याच्या नावाची घोषणा करण्यात आली.इंचियोन येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णवेध घेत जीतूने इतिहास घडविला. या यशामागे अथक परिश्रम, एकाग्रता आणि खेळाप्रती असलेले प्रेम यामुळेच ही यशाची भरारी घेणे शक्य झाल्याचे जीतूने सांगितले. पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा घोळका अवतीभवती पाहून काहीसा भारावलेला जीतू प्रत्येक प्रश्नाला स्मितहास्याने उत्तर देत होता. आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सुवर्णपदक जिंकणे ही स्वप्नवत बाब असल्याचे सांगून तो म्हणाला, ‘दक्षिण कोरियात भारतीय ध्वज मोठ्या डौलाने फडकण्यास मी कारणीभूत ठरलो, याहून अभिमानाची बाब काहीच असू शकत नाही. नेमबाजीत सातत्य महत्त्वाचे असते. भारतीय लष्कराकडून मिळाल्याने हे सुवर्णपदक पटकावू शकलो.’ नेपाळमधील संखुआ सभा जिल्ह्यात जन्मलेल्या या खेळाडूला आता संपूर्ण भारत ओळखतो. मात्र हे खरे असले तरी आजही प्रत्येकाला स्वत:ची ओळख करून द्यावी लागते, याची त्याला खंत वाटते.