शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा भ्रष्टाचारमुक्त राहील

By admin | Updated: March 7, 2016 03:16 IST

भारताच्या यजमानपदाखाली ८ मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद

मुंबई : भारताच्या यजमानपदाखाली ८ मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भ्रष्टाचारविरोधी समितीचे प्रमुख सर रोनी फ्लॅनगन यांनी स्पष्ट केले. फ्लॅनगन म्हणाले, ‘‘आयसीसीच्या यापूर्वीच्या प्रमुख स्पर्धांप्रमाणे या वेळीही खेळाडू व अन्य व्यक्तींसाठी गैरव्यवहाराबाबत माहिती देण्यासाठी २४ तास खुली राहणारी हॉटलाईन तयार करण्यात आली आहे. मानवी प्रवृत्ती लक्षात घेता गैरव्यवहाराच्या धोक्याचा समूळ नायनाट करणे अशक्य आहे.’’पत्रकार परिषदेत बोलताना फ्लॅनगन म्हणाले, ‘‘विश्व टी-२० चॅम्पियनशिपमध्ये महिला व पुरुष अशा दोन्ही विभागांमध्ये एकूण ५८ सामने होणार आहेत. हा अनुभव अविस्मरणीय ठरेल, अशी आशा आहे. या स्पर्धेनंतर चाहत्यांनी क्रिकेट आणि तेथील अनुभवांबाबत चर्चा करावी, याला प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धा भ्रष्टाचारमुक्त राहील, यासाठी प्रयत्नशील आहोत. भ्रष्टाचार रोखणे आणि खेळात भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न हाणून पाडणे, आमचे मुख्य कार्य आहे. आम्ही खेळाडू, सपोर्ट स्टाफ व सामनाधिकारी यांच्यासाठी प्रबोधन कार्यक्रम राबविला आहे. कुठल्याही संशयित व्यक्तीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती आम्हाला मिळायला हवी. अशा व्यक्तीबाबत तक्रार केली नाही तर आयसीसी भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार तो गुन्हा ठरेल.’’ आयसीसी हॉटलाईनबाबत बोलताना फ्लॅनगन म्हणाले, ‘‘मी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटलाईनबाबत बोलत आहे. आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी असलेल्या हॉटलाईनमध्ये भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर आहे. त्यांना मोबाईल २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.