चायनीज कुंग फू

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:23+5:302014-12-18T22:39:23+5:30

चायनीज कुंग फू खेळाला मान्यता द्या

Chinese Kung Fu | चायनीज कुंग फू

चायनीज कुंग फू

यनीज कुंग फू खेळाला मान्यता द्या
नागपूर : चायनीज कोशु कुंग फू या खेळाला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळण्यासाठी या खेळाच्या फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
गेली २० वर्षे हा खेळ भारतात यशस्वीरीत्या वाटचाल करीत असून आंतरराष्ट्रीय महासंघाची भारतीय महासंघाला मान्यता आहे. भारतात आतापर्यंत या खेळाच्या दहा राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद राऊत यांनी क्रीडामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता प्रदान करण्यासाठी हवे ते सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे राऊत यांनी एका पत्रकात म्हटले आहे. सोनोवाल यांना फेडरेशनच्यावतीने राऊत आणि फेडरेशनचे आश्रयदाते सुरेश चौधरी यांनी स्मृतिचिन्ह भेट दिले.(क्रीडा प्रतिनिधी)
................................

Web Title: Chinese Kung Fu