Chhatrapati Shivaji Maharaj suspended the Kabaddi tournament | छत्रपती शिवाजी महाराज राज्य कबड्डी स्पर्धा स्थगित

छत्रपती शिवाजी महाराज राज्य कबड्डी स्पर्धा स्थगित

मुंबई : पिंपरी येथे १८ मार्चपासून होणारी २१ वी छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अनिश्चित कालावधीकरिता स्थगित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्टÑ राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील यांनी कळवले आहे.

पिंपरी येथील नव महाराष्ट्र विद्यालयांच्या मैदानावर १८ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ती स्थगित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पुढील तारखा लवकरच कळविण्यात येतील, असे पाटील यांनी कळविले आहे.

त्याचबरोबर उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने काकरी-सोनभद्र येथे १९ ते २२ मार्च रोजी होणारी ६ वी कुमार/कुमारी गट फेडरेशन चषक स्पर्धादेखील स्थगित करण्यात आली आहे, असे राज्य संघटनेने कळविले आहे.
 

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj suspended the Kabaddi tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.