शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती वानखडे खेळणार जागतिक बुद्धिबळ स्पर्धा

By admin | Updated: October 13, 2016 01:05 IST

बुद्धिबळाच्या सारिपाटावर भल्याभल्यांना मात देणारी अकोल्याची चिमुकली बुद्धिबळपटू संस्कृती संघदास वानखडे ही आता जॉर्जिया येथे १७ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान

अकोला : बुद्धिबळाच्या सारिपाटावर भल्याभल्यांना मात देणारी अकोल्याची चिमुकली बुद्धिबळपटू संस्कृती संघदास वानखडे ही आता जॉर्जिया येथे १७ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान होणार असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आपली चुणूक दाखविणार आहे. यासाठी सध्या ती पुणे येथे भारताचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.संस्कृतीने अडीच वर्षांची असताना पहिल्यांदा बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. या खेळाप्रती तिचे आकर्षण पाहून तिचे वडील संघदास वानखडे यांनी तिला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले. त्यानंतर तिला या खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्रात पाठविले. अल्पावधीतच संस्कृतीने बुद्धिबळात प्रावीण्य मिळविले. सध्या दहा वर्षांची असलेल्या संस्कृतीने आतापर्यंत श्रीलंका, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया, थायलंड, सिंगापूर व मंगोलिया येथे शालेय बुद्धिबळ स्पर्धा गाजवून सुवर्णपदक पटकावले. विदेश दौऱ्यासाठी तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)चे सहकार्य लाभले आहे. संस्कृती सध्या पुणे येथे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे व मृणालिनी कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. (प्रतिनिधी)