शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूच्या क्लास वन नोकरीसाठी बदलला कायदा

By admin | Updated: May 17, 2017 04:11 IST

बॅडमिंटन स्टार, रिओ आॅलिम्पिकची रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला आंध्र सरकारमध्ये क्लास वन नोकरी देण्यासाठी आंध्र लोकसेवा आयोग कायद्यातील दुरुस्तीस

अमरावती : बॅडमिंटन स्टार, रिओ आॅलिम्पिकची रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला आंध्र सरकारमध्ये क्लास वन नोकरी देण्यासाठी आंध्र लोकसेवा आयोग कायद्यातील दुरुस्तीस मंगळवारी राज्य विधिमंडळाने परवानगी दिली.आंध्र शासनाच्या १९९४ च्या कायद्यानुसार राज्य शासनात ‘अ’ वर्ग नोकरी देताना उमेदवाराची निवड आंध्र लोकसेवा आयोगाची निवड समिती किंवा सेवायोजन कार्यालयाद्वारे करण्याची तरतूद होती. या कायद्यात दुरुस्ती करीत अत्युच्य कामगिरी करणारे बॅडमिंटन खेळाडू यास अपवाद असतील, असा बदल सुचविण्यात आला आहे. कॅबिनेटच्या मंजुरीस बळ देता यावे यासाठी अधनियमाच्या कलम चारमध्ये दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. यानुसार सिंधूला राज्य सेवेत विभागीय महसूल अधिकारी म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. राज्याचे अर्थमंत्री यानामाला रामाकृष्णाडू यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवताच कुठल्याही चर्चेविना सर्वसंमतीने पारित करण्यात आला. थोड्याच वेळात विधानपरिषदेने या कायद्यास मंजुरी प्रदान केली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सिंधू हिला राज्याची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनविण्याची सरकारची इच्छा असल्याचे जाहीर केले. माझे सरकार राज्यातील अन्य योग्य खेळाडूंना देखील थेट नोकरी देण्यास कटिबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली.(वृत्तसंस्था)