शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘डिव्हिलियर्सला गोलंदाजी करणे आव्हानात्मक’

By admin | Updated: April 9, 2015 01:13 IST

आॅस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मिशेल जॉन्सन आयपीएलमध्ये जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळेल

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मिशेल जॉन्सन आयपीएलमध्ये जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळेल तेव्हा त्याच्यासमोर पहिल्या लढतीत आव्हान असेल ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आक्रमक फलंदाज अ‍ॅबी डिव्हिलियर्सविरुद्ध गोलंदाजी करणे.जॉन्सनने डिव्हिलियर्सचे वर्णन, क्रिकेटच्या सर्वच स्वरूपातील सर्वोत्तम फलंदाज असे केले आहे.तो म्हणाला, की गोलंदाजीसाठी अ‍ॅबी डिव्हिलियर्स हा सर्वात कठीण फलंदाज आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने शानदार कामगिरी केली आहे. तो सर्वच स्वरूपातील सर्वोत्तम खेळाडू आहे. अ‍ॅबीला गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते. त्याने किंग्ज इलेव्हनचा युवा भारतीय गोलंदाज संदीप शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांचीही स्तुती केली. तो म्हणाला, की मी गेल्या वर्षी संदीपसोबत खेळलो होतो. त्याच्या खेळात सातत्याने प्रगती होत आहे. मी काल त्याला नेटस्वरही पाहिले. त्याचा वेग वाढला आहे. संदीपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो शिकण्यासाठी नेहमी आतुर असतो आणि युवा खेळाडूत हा गुण आवश्यक असतो. मी नवीन खेळाडू शार्दूलवरही प्रभावित आहे.जॉन्सननुसार वन डे आणि टी-२0 क्रिकेटमध्ये गोलंदाजीत जास्त फरक नाही. तो म्हणाला, वन डेतून टी-२0 शी जुळवून घेण्यासाठी काही बदल करावे लागतील असे मला वाटत नाही. आम्ही एका आठवड्याआधी वर्ल्डकप फायनल खेळलो आणि आता आयपीएल खेळत आहोत. त्यानंतर वेस्ट इंडीजमध्ये कसोटी क्रिकेट खेळू. खेळाडूला लगेच त्या स्वरूपाशी जुळवून घेता आले पाहिजे.तसेच फलंदाजांना विचलित करण्यासाठी वेगाची गरज आहे; १४0 कि. मी.पेक्षा जास्त वेगाने योग्य दिशेने गोलंदाजी केल्यास ते कोणत्याही फलंदाजासाठी कठीण आव्हान असेल. (वृत्तसंस्था)